संगमनेरात एकाच दिवशी 45 रुग्ण! संगमनेरच्या मागे कोरोनाचा शनि! बाप रे.! संख्या 528
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात कोरोना थांबण्याचे नाव काय घेत नाही. आज सकाळी 11 पॉझिटीव्ह मिळून आल्यानंतर रात्रीचे 12 वाजून दुसरा दिवस उजाडण्यापुर्वीच जिल्हा रुग्णालयातून मध्यारात्री 34 अहवाल प्राप्त झाले असून त्यात राजापूर, कोेंची, पिंपळगाव ढेपा, केळेवाडी, शिपलापूर, गुंजाळवाडी यांच्यासह शहरातील बाजारपेठा आणि उच्चभ्रु वसाहतीत कोरोनाने थौमान घातले आहे. त्यामुळे आत तालुक्यातील कोरोनाची संख्या 528 पर्यंत गेली आहे. तर शासनाच्या कागदावर 17 जण मयत झाले आहेत. मात्र, तशी कोरोना बाधितांची आकडेवारी आणि मयतांची आकडेवारी ही सामान्य मानसांना धक्का देणारी आहे.
रात्री जो अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात संगमनेर शहरातील पद्मानगर येथे 28 वर्षीय पुरूष, 22 व 47 वर्षीय महिला तर 3 वर्षीय चिमुरडी अशा चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच बाजारपेठेत 36 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला, जनतानगर येथे 45 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, जेधे कॉलनी 52 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय तरुण, 46 वर्षीय महिला, संगमनेर शहरात 28 वर्षीय महिला तर 6 व 1 वर्षीची चिमुकली यांना कोरोना झाला आहे. तसेच विद्यानगर येथे 34 व 47 वर्षीय पुरुष, बडोदा बँक 33 व 35 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, तर संगमनेर ग्रामीणमध्ये राजापूर येथे 30 वर्षीय पुरुष, कोंची येथे 22 वर्षीय तरुण, पिंपळगाव ढेपा 15 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथे 65, 42 व 25 वर्षीय पुरुष, शिपलापूर येथे 23 वर्षीय महिला, गणेश नगर 33 वर्षीय महिला व 2 वर्षाची चिमुकली, कुरण येथे 45 वर्षीय पुरुष, गशेनगर येथे 10 वर्षीय मुलगी, खंडोबा गल्ली येथे 72 व 40 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे 45 वर्षीय महिला तर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये 53 वर्षीय पुरुष असा 34 जण कोरोना बाधित मिळून आले आहेत.
संगमनेरात शहराला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. शनिवारी तर चक्क संगमनेरला शनि-वार लागल्याचे पहायला मिळाले आहे. कारण, एका दिवसात 45 रुग्ण मिळून आले आहे. तर एका संशयित महिलेचा मृत्यू झाला आहे. या पालिकडे अकोले तालुक्यात देखील काल एक खाजगी अहवाल मिळाला असून तो व्यक्ती कुठला आहे. याची माहिती प्रशासनाला मिळाली नाही. मात्र, अकोले तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे 29 अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे एकीकडे अकोल्यात कोरोनाचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात दिसून येत आहे. तर उलटपक्षी संगमनेरात रिपोर्ट पाठविले ते बहुतांशी पॉझिटीव्हच मिळून येत आहे. त्यामुळे नक्कीच येथे कोठेतरी यंत्रणा कमी पडते आहेे. हे स्पष्ट होत आहे.