आज अखेर संगमनेरला कोरोनाचा 51 रुग्णाांचा आहेर! तर अकोल्यात चार रुग्ण! नव्या गावांना संसर्ग!



सार्वभौम (संगमनेर) :- 
                        रोज संगमनेरात कोरानाचा वाढता प्रादुर्भाव आहे. येथे रुग्ण मिळून येतात आणि नैसर्गिक पद्धतीने बरे होताता. यावर उपचार नाही हे जगजाहीर आहे. मात्र, ही संख्या कोठेतरी थांबली पाहिजे यासाठी कोणी ठोेस काम करायला तयार नाही तर कोरोना पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह यात कोरोनाची विश्रांती आणि तो अटोक्यात आला असे शब्दच कानावर पडायला तयार नाही. त्यामुळे हा अशुभ कोरोना रोज शुभ आकड्यांना ग्रासत असून आज देखील त्याने संगमनेरला 51 रुग्णांचा आहेर दिला आहे. आता पॉझिटीव्ह रुग्ण सापडणे, त्यांच्या सानिध्यातील व्यक्तींचे स्वॅब घेणे, ते नगरला पाठविणे, तो परिसर कंटेनमेंट करणे आणि तेथे सुविधा पुरविणे अंतीम क्षणी आलेले बहुतांशी पॉझिटीव्ह अहवाल जाहिर करणे, यापलिकडे आता वेगळी काही उपायोजना संगमनेरात दिसून येत नाही.  
                   आज संगमनेर आणि अकोले तालुक्यात कोरोनाचे नवे रुग्ण मिळून आले आहेत. त्यात संगमनेरात 51 तर अकोल्यात पाच रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात कोरोनाचे आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. संगमनेर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आता काही नवी बाब नाही. मात्र, अकोले तालुक्यात काही गावे नव्याने बाधित होत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. त्यामुळे, आता प्रशासनावर भार टाकण्यापेक्षा नागरिकांनीच स्वत:हून काळजी घेणे अपेक्षित आहे.
              आता संगमनेर तालुक्यात कोरोनाचे 51 रुग्ण आणि या पलिकडे काही खाजगी सात रिपोर्ट असल्याची माहिती मिळाली आहे. यात संगमनेर तालुक्यात एकूण साईनाथ चौक 1, आश्वि बु 3, चंद्रशेखर चौक 1, कुरण रोड 2, खंडोबा गल्ली 3, पावबाकी रोड 2, तहसील कचेरी 1, निमगाव पागा 3, शेडगाव 3, इस्लामपूरा 1, इंदिरानगर 01, घुलेवाडी 1, जोर्वे 01, पद्मानगर 01 असे पहिले रिपोर्ट आले होते. त्यानंतर पुन्हा पाच अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यात रायतेवाडी 1, सावरगाव 3, घारगाव 1 तर खाजगी रुग्णालयात सात रिपोर्ट मिळून आले आहेत. तर उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये सुतार गल्ली 1, विद्यानगर 2, घोडेकर मळा 1, पावबाकी रोड 1, महात्माफुले नगर 1, खराडी 1, रायते 1, निमगाव पागा 1, दाढ बु 1, पेमगीरी पाच तर पावबाकी 1 असे 17 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
तर अकोले तालुक्यातील जांभळे येथे 1, कोतुळ येथे 1, बेलापूर येथे 1 तर औरंगापूर येथे एक अशी पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अकोल्याचा आकडा अगदी शंभरीच्या उंबर्‍यावर जाऊन पोहचला आहे. औरंगपूर येथे जो तरुण मिळून आला असून तो अवघ्या 22 वर्षाचा आहे. तर जांभळे 61 वर्षेे, बेलापूर 47 वर्षे कोतुळ येथील व्यक्ती 51 वषीर्र्य अशा व्यक्तींना बाधा झाली आहे. या पलिकडे अकोले तालुक्यातील तब्बल आठ जणांनी कोरोनावर मात केली आहेे. त्यामुळे येथे अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या कमी झाली असून कोरोनाला आळा बसल्याचे दिसते आहे. तर संगमनेरात देखील 6 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 
                    दरम्यान आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 161 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये 90, अँटीजेन चाचणीत 26 आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या 45 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 452 इतकी झाली आहे. दरम्यान, आज 133 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 418 झाली आहे.