अकोले तालुक्यात पुन्हा पाच रुग्ण! दर शनिवारी जनता कर्फ्यु! 24 तास अकोले बंद!
- महेश जेजुरकर
सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अटोक्याच्या बाहेर जाऊ लागला आहे. मात्र, तालुक्यात आजही कोरोनाचे रुग्ण बाहेरुन येत आहेत. तर तालुक्यात तीसरी स्टेज बर्यापैकी कमी आहे. आता पुन्हा धुमाळवाडी येथे जो सात वर्षाचा बालक कोरोना बाधित मिळून आला होता. त्याच्या आईचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, कोरोनाचे सोडा, पण येथे फार मोठे मातृत्वाचे दर्शन घडले आहे. या पलिकडे बहीरवाडी येथील आणखी तिझांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह मिळून आले आहे. तसेच पेंडशेत येथे देखील आणखी एक रिपोर्ट कोरोना बाधित असल्याचे मिळून आले आहेत. त्यामुळे आज एकाच दिवशी कोरोनाचे सात रूग्ण अकोले तालुक्यात मिळून आले आहेत. त्यामुळे हळूहळूू कोरोनाने अकोले तालुक्यात सत्तरी पुर्ण केली असून हा आकडे 73 वर गेला आहे. या वाढत्या आकडेवारीचा विचार करता अकोले शहरात व्यापार्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. की, जोवर कोविडचा काळ आहे. तोवर दर शनिवारी अकोले शहर आणि बाजारपेठा बंद राहणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती माहिती अशी की, अकोल्यातील कोरोना बाधितांची संख्या आता सत्तरीपार गेली आहे. तरी आजवर 39 रुग्णांंनी कोरोनावर मात केली आहे. यापुर्वी पेंडशेत येथे एका 27 वर्षीय तरुणीला कोरोनाची बाधा झाली होती. त्याच्या संपर्कातील अन्य दोन व्यक्ती त्याच्या संपर्कात आल्या आहेत. तर धुमाळवाडी येथे अवघ्या 7 वर्षाच्या बालकाला कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होेती. त्याच्या संपर्कात त्याची आई आल्यामुळे त्या माऊलीला देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
खरंतर हे कुटुंब मुंबईच्या कल्याण येथून आले होते. त्यांचा धुमाळवाडीत प्रवेश देखील झालेला नाही. ते आल्यानंतर त्यांना अभिनव शिक्षण संस्था येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यापासून कोणाला कोरोनाची बाधा होईल असा एकाही प्रसंग नाही. त्यामुळे, धुमाळवाडी गावाने भिती बाळगण्याचे कोणताही कारण नाही. यात एक मात्र नक्की की, बाळाला सोडून आईचे अस्तित्व नाही, त्यामुळे मुलाचा आनंद असो वा दु:ख ते आईच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. हेच यातून प्रतित झाले आहे. त्यामुळे ती माऊली आणि तिचा लाढला या महामारीतून लवकर बरा होईल आणि आपल्या बाळाला आई तिच्या कुशित घेण्याचा प्रसंग लवकरात लवकर त्यांच्या पदरी पडो.! हीच प्रार्थना.
या पलिकडे बहिरवाडी येथे कोरोनाने आणखी डोकेदुखी वाढविली आहे. तेथे एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात एक धक्कादायक माहिती अशी की, ज्या तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. तो एकदम ठणठणीत असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ज्याला कोरोना घोषित केला आहे. त्याला मात्र सर्दी नाही, खोकला नाही, कणकण नाही, श्वास घ्यायला त्रास नाही, तरी देखील त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला कसा. याबाबत मात्र त्यांना शॅक बसला आहे. त्यामुळे हे स्वॅब मशिन, किंवा हे अहवाल खरोखर वस्तुनिष्ठ आहेत का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. तर आपला पुन्हा स्वॅब घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
आता एक महत्वाचा विषय असा की, अकोले तालुक्यात कारखाना रोड येथे कोरोनाची प्रादुर्भाव झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर शहर सात दिवस बंद करण्याची निर्णय घेण्यात आला होता. मात्र, चार दिवस उजडतात कोठे नाहीतर काही व्यापार्यांना रहावेनासे झाले. त्यानंतर त्यांनी थेट बैठका घेऊन अकोले पुन्हा चालु करण्याचा निर्णय घेतला आणि शनिवारीच अकोले पुन्हा सुरू झाले. आता पुन्हा व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी नव्याने निर्णय घेतला. की, जोवर कोरोनाचा कालावधी सुरू आहे. तोवर प्रत्येक शनिवारी अकोले शहर आणि बाजारपेठा बंद राहणार आहे. त्यामुळे आठ दिवसात एक दिवस शहर आराम करणार आहे. त्यामुळे तालुक्यातील मजूर आणि अन्य व्यक्तींना शनिवारी कोणत्याही प्रकारची खरेदी करण्यासाठी येऊ नये. यावेळी फक्त दवाखाने, मेडिकल व शेतीची औषध विक्री दुकाने चालू राहणार आहे. तर सरकारी कार्यालयांना शनिवार सुट्टी असते. मात्र आत शहर आणि बाजारपेठांना देखील सुट्टी असणार आहे.तर या दरम्यान बड्या व्यापारी वर्गानी मनमानी पहायला मिळाली आहे. हे यांच्या पद्धतीने बैठका घेतात, निर्णय घेतात, मात्र अशा वेळी सामान्य व्यवसायीक (जसे की टपरी धारक) यांना विश्वासात घेतला जात नाही. परंतु यांना जर प्रस्तापित व्यापार्यांच्या विरोधात बंड पुकारून कायदेशीर मार्गाने लढले तर यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे बड्या आणि प्रस्तापित तसेच पुढारपण करणार्या व्यापार्यांनी सामान्य व्यापार्यांचा विचार करावा, तसेच त्यांना विश्वासात घ्यावे. अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे काल अकोले बंदला ख्वाडा घालणार्या बड्या व्यापार्यांनाच उद्या छोट्या व्यापार्यांनी शह दिला नाही म्हणजे बरे.!
--------------------------------------
आपल्या व्यावसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 68 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 74 लाख वाचक) ============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------