संगमनेरात नव्याने 21 रुग्ण, संख्या 551 वर, अकोल्यातही कोरोनाचा रुग्ण!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरात आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढती असल्याचे दिसत आहे. येथे जनता विश्रांती घ्यायला तयार नाही तर कोरोना देखील थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे संगमनेरात जनतेचा बेजबाबदारपणा आणि आणि कोरोनाची घोडदौड यांच्यात चांगलीच चढाओढ लागल्याचे दिसत आहे. आज पुन्हा नव्याने कोरोनाची 16 रुग्ण सरकारी लॅब तर पाच रुग्ण खाजगी लॅब असे 21 रुग्ण संगमनेर तालुक्यात कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संगमनेरची संख्या आता 551 वर जाऊन पोहचली आहे. तर 17 जणांना कोरोनाने आपली शिकार केली आहे.
संगमनेरात काल सकाळी 11 तर सायंकाळी 36 रुग्ण मिळून आले होते. त्यानंतर आज सायंकाळी हाती आलेल्या अहवालात 16 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात अशोक चौक (1), पदमानगर (3), घुलेवाडी (7), सुकेवाडी (1), धांदरफळ (1), उमरी(1), निमोन(1), वारुडी पठार(1) अशा 16 जणांना बाधा झाली आहे. तर खाजगी अहवालात सावतामाळी मळा येथे 2, कुरणरोड येथे 1, चव्हाणपुरा येथे 1 तर ओझर येथे 1 अशा पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या पलिकडे अकोले तालुक्यात वाघापूर येथे एका तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर अकोल्याचे पॉझिटीव्ह संख्या अगदी शुल्लक असून निगेटीव्ह येण्याचे प्रमाण चांगले आहे. हे अकोले तालुक्यासाठी एक जमेची बाजू आहे.
तर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 379 इतक्या रुग्णांची वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 109, अँटीजेन चाचणीत 05 जण बाधित आढळून आले. तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 265 रुग्णांची नोंद एकूण रूग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 1 एक हजार 451 इतकी झाली आहे. हे असे असले तरी आनंदाची बाबा म्हणजे आज तब्बल 465 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 945 झाली आहे.आता आज जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यात आणखी 45 रुग्णांची भर पडली. यामध्ये, कर्जत (4) - राशीन (3), थेरवाडी (1), अहमदनगर (2) - गुलमोहर रोड (1), अहमदनगर (1) राहाता (5) - वाकडी (1), गणेश नगर (3), साकुरी (1), श्रीगोंदा (3)- बनपिंप्री (1), काष्टी (2), श्रीरामपुर (5)- रेल्वे कॉलनी (1), शहर(4). संगमनेर (16) - अशोक चौक(1), पदमानगर (3), घुलेवाडी (7), सुकेवाडी (1), धांदरफळ (1), उमरी(1), निमोन(1), वारुडी पठार(1) अकोले (01) -वाघापूर (1), नेवासा (9) - जळका (1), भेंडा बु.(1),गळनिंब (2) करजगाव (5) अशा एकूण 45 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.