धक्कादायक.! रातोरात जीवाची मुंबई झाली! अकोले तालुक्यात एकाच कुटुंबात 11 पॉझिटीव्ह! रेड्यात धुसला कोरोना!


सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
                     अकोले तालुक्यातील माणिक ओझर येथे एकाच कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक रिपोर्ट आज प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हे सर्व घडले कसे? तर येथे एक आजीबाई आजारी पडता आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक राजूरला येतात आणि कुटुंबात राहून जातात, इतकेच काय! केवळ या कुटुंबातील एक तरुण रातोरात मुंबईला जातो आणि आपल्या भाचीला घेऊन येतो. या सगळ्या प्रकारामुळे घरात एक ना दोन तब्बल 11 जणांना मुंबईचा वाळवळा मिळतो. त्यांच्या या एका बेजबाबदार पणामुळे सर्व तालुका, प्रशासन आणि गाव वेठीस धरले जात आहे. हा बेजबाबदार पणाचा कळस नाही तर काय? इतकेच काय? तहसिलदार साहेब जीव तोडून सांगतात, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांनी गावात येणार्‍यांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी. मात्र, एक तलाठी व ग्रामसेवक 10 ते 12 गावे पाहतात. त्यांना दोष देण्यात अर्थ तरी काय? मात्र, सरपंच आणि पोलीस पाटील यांनी त्यांची जबाबदारी काय पार पाडली? याची खर्‍या अर्थाने चौकशी होणे गरजेचे आहे. इतकेच काय! जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कडक कारवाई देखील केली पाहिजे. कारण, जर एक व्यक्ती 11 जणांना बाधित करु शकतो तर अकोल्याचे मालेगाव नाही तर आमेरिकेसारखी परिस्थिती पहायला मिळेल. त्यामुळे, आता तरी कठोर भुमिका घेणे गरजेचे आहे. हे बाहेरुन येणारे महाशय आज माणिक ओझर येथेच नाही तर वाघापूर येथे एक, गोडेवाडीत दोन तर शहराच्या जवळच रेडे येथे एक असे 13 रुग्ण एकाच दिवशी मिळून आले आहेत. त्यामुळे, ही एक धक्कादायक बाब अकोले तालुक्याला विचार करायला लावणारी आहे.
                      याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोले तालुक्यात दुर्गम भागातील माणिक ओझर येथे गेल्या दहा दिवसांपुर्वी एका वृद्ध महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर मातृत्वापोटी या आजीबाईस भेटण्यासाठी त्यांचे मुंबईतील पाहुणे येऊन गेले. खर्‍या अर्थाने तेथून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. हा प्रकार येथेच थांबला नाही. तर ज्या तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची बहिन मुंबईला पोलीस दलात कार्यरत आहे. तिच्या मुलीस गावी आणण्यासाठी हा तरुण रातोरात मुंबई ते अकोले असा प्रवास करून आला. मात्र, त्याला कोणी अडविले नाही ना कोणी विचारणा केली. त्यामुळे मुंबईचा हा कोरोना माणिक ओझरमध्ये सहज दाखल झाला. त्याचा परिणाम त्याच्याच कुटूंबातील 10 जणांना आता भोगावा लागतो आहे. एकाच कुटुंबात 11 जणांना कोरोनाची बाधा म्हणजे हे पुणे-मुंबई प्रमाणे  अकोल्यात परिस्थिती पहायला मिळत आहे. खरंतर मुंबईहून आलेल्या व्यक्तींनी जनतेच्या, गावाच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकली खरी. मात्र, तेे कोरोनाच्या डोळ्यात धूळ फेकू शकले नाही. त्यामुळे, तुम्ही जनतेला फसवू शकतात, कोरोनाला नाही. हे देखील आता स्पष्ट झाले आहे.
                                     
खरंतर जगात कोरोनाचा कहर सुरू असताना अकोले तालुक्यात अगदी एकही रुग्ण नव्हता. मात्र, जसे नियम शिथिल झाले तसे बाहेरून येणार्‍यांचा सुळसुळाट वाढला. अकोल्यात स्थानिक व्यक्तींना कोरोनाची लागण नाही. मात्र, बाहेरुन आलेल्यांमुळे स्थानिक व्यक्तींना त्याचा आचार दिला आहे. अगदी आठ दिवसांपुर्वी लहित येथे पुण्याहून आलेल्या एकाचा मृत्यू झाला, अनेकांना बाधा झाली. म्हणजे हे कसे होते आहे, याचा उगम कोठे आहे, हकनाक बळी कसे जात आहे. हे सर्व चित्र डोळ्यासमोर क्लेर असून देखील लोक बेजबाबदार पणे का वागतात हे कळायला तयार नाही. यासाठी किमान जे लोक बाहेरुन येतात त्यांनी स्वत:हून प्रशासनाला माहिती देणे गरजेचे आहे. स्वत:हून क्वारंटाईन होणे अपेक्षित आहे. त्रास होऊ लागल्यास डॉक्टरांकडे जाणे अपेक्षित आहे. मात्र, एक गोष्ट लपविण्याच्या नादात आपण सगळे कुटूंब बाधित करुन टाकतो हे ज्ञान लोकांना का प्राप्त होत नाही. त्यामुळे आता प्रशासनाने कडक भुमिका घेत जबाबदारी दिलेल्या व्यक्तींना सुचना करणे गरजेचे आहे. जळगाव येथे जसे एका पोलीस पाटलावर गुन्हा दाखल करून त्याची पाटीलकी घालविली. अशा प्रकारच्या कारवाया येथे अपेक्षित आहे. कारण, कालपर्यंत येथे एकही रूग्ण नसताना आज एकाच कुटूंबात 11 रुग्ण मिळून येऊ लागले आहे. तर तालुक्यात कोरोनाने शतक गाठले आहे. हे कशाचे द्योतक आहे. खरंतर अकोले तालुका क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. त्यामुळे प्रशासन कोठे-कोठे पोहचणार आहे. मात्र, स्थानिक लोकांनी तरी स्वत:ची आणि गावाची काळजी घेणे अपेक्षित आहे. असे झाले नाही तर येणारा काळ अकोल्यासाठी फार घातक ठरणार आहे.
महत्वाचे...
तर आता प्रशासनाने एक कठोर आणि कडक भूमिका घेतली आहे. जेथे कोरोनाचा बाहेरुन येणारा रुग्ण मिळून येईल किंवा अन्य पाहूणा गावात येऊन त्याची माहिती लपविली जाईल त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. इतकेच काय! जर स्थानिक कोरोना प्रतिबंधक कमिटी जर अशा प्रकारची माहिती घेत नाही किंवा कोणाला पाठीशी घालते आहे. असे सिद्ध झाले तर त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. मात्र, हे सर्व साध्य करण्यासाठी महसूल विभागाला एक मोबाईल नंबर खुला करावा लागणार आहे. त्यावर गावातील लोक बरोबर माहिती देऊ शकतात. असे झाले तरच हे छुपारुस्तम क्वारंटाईन करण्यात प्रशासनाला यश येणार आहे. तसेच गाव पातळीवरील राजकारणासाठी मिळणारा अभय देखील उघडा पडू शकतो. त्यामुळे, हा फंडा तालुक्याला वाचवू शकतो. तर येणारी माहिती गोपनिय ठेवली तर हा एक अनोखा उपक्रम तालुक्यात होऊ शकतो. तो यशस्वी झाला तर जिल्हाभर याची अंमलबजावणी होऊ शकते.

महत्वाचे...
यामध्ये माणिक ओझर येथील 09 गोडेवाडी (केळी) येथील 02 तर रेडे गावातील एक व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. गोडेवाडी येथील 40 वर्षीय पुरूष 35 वर्षीय महिला, रेडे येथील 22 वर्षीय तरुण तर माणिक ओझर येथील 58 वर्षीय, 60 वर्षिय,28 वर्षीय,22 वर्षीय महीला 25 वर्षीय पुरुष व 11 वर्ष,08 वर्षीय, 04 वर्षीय, 02 वर्षीय मुली अश्या एकुण तालुक्यातील 12 जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. माणिक ओझर या कुटुंबातील व्यक्ती राजूर येथील बँकेत, कृषी सेवा केंद्र येथे खत घेण्यासाठी जनावरांच्या दवाखान्यात, किराणा दुकानात राजूर मध्ये पूर्ण गावात फिरल्याचे बोलले जात आहे. माणिक ओझरं गावात शेतीमध्ये आवणीं करण्यासाठी गेले असे बोलले जात आहे. तर संगमनेर तालुक्यात आज दिवसभरात 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर त्यात 18 शासकीय असून सात खाजगी ठिकाणी तपासणी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे येथील संख्या 560 वर गेली आहे.
- आकाश देशमुख