संगमनेरच्या कुरणमध्ये 11 तर अकोल्याच्या ब्राम्हणवाड्यात दोन रुग्ण!


सार्वभौम (संगमनेर) :-
                         संगमनेर शहराच्या लगत असणार्‍या कुरण येथे पुन्हा 11 कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहेत. तर संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी येथे आणखी 1 रुग्ण मिळून आला असून अकोले तालुक्यातील ब्रम्हणवाडा येथे आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे अकोल्याच्या चिंता दिवसेंदीवस वाढत चालल्या असून कोरोना बाधितांच्या संखेने आता तिशी ओलांडली आहे. तर संगमनेर तालुक्यातील कुरण हे गाव आता कोरोनाने ग्रासल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाना आपापली काळजी घ्या, बाहेर पडू नका, प्रशासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर आनंदाची गोष्ट अशी की, काळेवाडी येथील नवरा नवरीचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून त्यामुळे प्रशासनाचे फार मोठे काम वाचले आहे.
                         
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील 16 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी कुरणचे 11, अकोल्याचे 2, पेमरेवाडी येथील 1, पारनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील 1, राहाता तालुक्यातील दाढ बु येथील एक अशा व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. नगर जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या 198 व्यक्ती सध्या उपचार घेत आहेत. तर 455 रुग्ण बरे झाले आहेत आणि 18 जणांचा आजवर मृत्यू झाला असून 671 रुग्णांची आजवर नोंद करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात कुरणमध्ये 36 रुग्णांची नोंद झाली आहे. तर यापुर्वी येथे संशयित दोन तर कोरोना बाधित म्हणन एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पहिल्यांदा आठ तर नंतर 22 आणि आता 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यात 38 वर्षीय पुरूष, 46 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय पुरूष, 8 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय महिला 25 वर्षीय पुरूष, 15 वर्षीय तरुणी, 8 वर्षीय मुलगी, 19 वर्षीय तरुणी अशा 11 जणांचा सामावेश आहे. तर 50 वर्षीय महिला ही पेमरेवाडी येथील आहे.
दरम्यान कुरण हे प्रशासनाने पुर्वीच कंटेनमेंट केले आहे. त्यामुळे तेथील प्रादुर्भाव रोखण्यास आता मदत होणार आहे. मात्र, या 11 जणांमुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.