संगमनेरच्या मालदड घुलेवाडीत भाऊ-भाऊ एकमेकांना भिडले.! काठ्या कुऱ्हाडीने हाणामाऱ्या। १५ जनांवर गुन्हे दाखल.!


सार्वभौम (संगमनेर) - 
                      दोन भावांमध्ये शेती वाटपाच्या वादातुन तुंबळ हाणामारी झाली. यात एकमेकांनवर लाथाबुक्या,काठी व कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना दि.12 जुन रोजी सायं.5वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरापासून 1किलोमीटर अंतरावर असलेल्या घुलेवाडी परिसरात घडली.यामध्ये अक्षय भालेराव याच्या हाताला तर अर्जुन भालेराव याच्या पायाला कुऱ्हाडीचे घाव लागले आहेत. त्यांच्यात परस्पर विरुद्ध पंधरा जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                                   
दरम्यान, संपत रामजी भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दादाभाऊ भालेराव यांच्या कडे सामाईक जमीन आहे.ती जमीन नावावर करून घेण्याचे बोल्यावर आरोपी यांनी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक बोलावून फिर्यादिस शिवीगाळ करून दमदाटी व लाथाबुक्यांनी,दांडक्याने मारहाण केली.त्यावेळी भांडना मध्ये आलेला फिर्यादीचा मुलगा प्रवीण यास आरोपी सुयोग भालेराव व अर्जुन भालेराव यांनी काठीने बद्दडले. व फिर्यादी यांचा पुतण्या अक्षय यास आरोपी दादाभाऊ भालेराव याने कुऱ्हाडीने अक्षयच्या हातावर घाव घातला.त्यामुळे तो चांगलाच जखमी आहे.आरोपी दादाभाऊ भालेराव व अन्य पाच आरोपींनी फिर्यादीच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान,दादाभाऊ रामजी भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादि वरून,आरोपी संपत रामजी भालेराव व प्रवीण भालेराव यांनी फिर्यादीच्या घरात घुसून बाहेर ओढीत आणले व आताच्या आता जमीन वाटप करून दे असे बोलुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादीचा मुलगा अर्जुन भांडना मध्ये आला.व त्यास आरोपी संपत भालेराव यांनी त्यांच्या हातातील कुऱ्हाड अर्जुनच्या उजव्या पायाच्या नळीवर मारली.त्यामुळे तो जखमी झाला आहे.फिर्यादीचा मुलगा सुयोग यास देखील आरोपी गणेश भालेराव व बाजीराव भालेराव यानी काठीने मारहाण केली आहे.तसेच आरोपी संपत भालेराव व गणेश भालेराव यांनी फिर्यादीच्या पत्नीला लाथा बुक्यांनी मारहाण
केली आहे.
दरम्यान, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व पुढील तपास तपासी अमलदार आहेर व दातीर करत आहे.