संगमनेरात विद्यमान नागरसेवकांचे पिताश्री निघाले कोरोना बाधित! कार्यालयानंतर कोरोनाचा मोर्चा प्रतिष्ठीतांकडे!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण मिळून आला आहे. हा व्यक्ती 73 वर्षीय असून तो नाशिक येथून प्रवास करुन आल्याचे समोर आले आहे. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून ते चक्क एका नगरसेवकाचे पिताश्री आहेत. त्यामुळे काल सरकारी कार्यालये तर आज सकाळी सामाजिक न्यायमंत्री आणि त्यांच्यापाठोपाठ आता या नगरसेवकांच्या पिताश्रींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, त्याच्या संपर्कात असणार्यांची शोधाशोध सुरू करण्यात आली असून प्रशासन पुन्हा कामाला लागले आहे.
सध्या संगमनेरातून आठ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. त्यात हा एक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून त्याच्यासोबत नगर जिल्ह्यातील सारसनगर येथील 58 वर्षीय व्यक्ती तर एमआयडीसीतील गजानन नगर येथे एका बाधित व्यक्तीच्या पत्नीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. या विद्यमान नगरसेवकांच्या या पिताश्रींना जेव्हा त्रास होण्यास सुरूवात झाली होती. तेव्हा त्यांनी एका ठिकाणी तपासणी केली. त्यानंतर त्यांनी नाशिकला हलविण्यात आले होते. मात्र, त्यांच्या तपासणीसाठी त्यांना पुन्हा नगरला पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट आच पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात कोरोना सापडला तर तो एकतर तो शहरातील असेल किंवा तो संगमनेराचा असेल असे शब्द आता अंगवळणी पडून गेले आहे. त्यामुळे संख्या वाढली असे म्हटले तरी संगमनेरकरांच्या उरात धडकी भरते आहे. मात्र, दुर्दैवाने कोणी फारशी काळजी घेताना दिसत नाही. आता प्रशासनासह समाजसेवक आणि नागरिक देखील होईल ते होईल याच भुमिकेत दिसत आहे. त्यामुळे संगमनेरात स्थानिक एक ना दोन तब्बल 35 जणांना बाधा झाली आहे. तर हीच लस ग्रामीणमधील 20 जणांना लागली आहे. म्हणजे हा प्रादुर्भाव बाहेरून आला असे नाही. तर स्थानिक लोक देखील फार जबाबदार आहे असे म्हणणे या आकडेवारीहून पाहिले तर धाडसाचे ठरेल.
काल एकाच दिवशी दहा रुग्ण पॉझिटीव्ह मिळून आले होते. त्यातील तब्बल आठ रुग्ण केवळ एकट्या संगमनेरातील होते. सकाळी तपासणी केलेल्या सात पैकी पाच तर निव्वळ महिलाच होत्या. तर त्याच्यासह काही बालकांचा सामावेश होता. याहून एक लक्षात आले की, कोरोना बाधितांची उठाठेव करतांना, त्यांचे जेवण पाणी, धुणे वैगरे कामात त्यांनी कितीही सोशल डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा होत असल्याचे वाटते आहे. या पलिकडे काही वृद्ध महिला आहे. यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यामुळे, त्यांना तत्काळ याचा प्रदुर्भाव होतो. यासाठी बाधित व्यक्तीनेच त्याचे चोचले कमी करुन स्वत:ची काळजी स्वत: घेतली पाहिजे. आता जिल्ह्यात 49 जणा अक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार चालु आहेत. तर जिल्ह्यात 246 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 54 जण महनगरपालिका हाद्दीतील असून 131 रुग्ण जिल्ह्यातील आहे. 3 व्यक्ती इतर राज्यातील असून आठ व्यक्ती अन्य देशातून आलेल्या आहेत. तर 51 जण इतर जिल्ह्यांतून आलेले आहेत. या सर्वांमध्ये कोरोनाचा विकास करण्यात संगमनेरचे नाव अग्रभागी आहे. येथे आजवर 81 रुग्णांची भर 246 मध्ये आहे.
आज मालेगावमध्ये आपण पाहिले की, आयुक्तासारख्या अभ्यासू अणि सुज्ञ व्यक्तीला कोरोनाने ग्रासले होते. राज्यात 2 हजार 500 पोलिसांना तर 245 पोलीस अधिकार्यांना कोरोना झाला आहे. इतकेच काय! महसूल अधिकारी व कर्मचारी देखील यात कोठे कमी नाही. संगमनेरात नायब तहसिलदारांना कोरोना झाल्याची अगदी ताजी घटना आहे. हा बहाद्दर येथेच थांबत नाही. तर पृथ्वी बाबा, मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज, सिनेअभिनेते यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर छगन चौघुले यांच्यासारख्या कलावंतांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे, नगरसेवक आणि त्यांचे वडीलच काय! काही देशांतील राष्ट्राध्यक्षांना देखील या कोरोनाने सोडले नाही. त्यामुळे, ह्युमीनीटी आणि विल पावर तसेच प्रशासन आणि आत्मविश्वासाच्या बळवर गाफील राहू नको. रोखठोक सार्वभौम आपल्याला घर बसल्या तत्काळ माहिती पुरवत आहे. घरी बसा, सेफ रहा, जे कोविड योद्धे आहेत. त्यांना बळ द्या.!