संगमनेरात कोरोनाचा नववा बळी, मालदडरोडच्या महिलेचा मृत्यू.! तिघांना बाधा, संख्या ८३ वर.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरानंतर त्याच्या आजूबाजुला असणाऱ्या प्रगत वसाहती आता कोरोनाच्या शिकार होऊ लागल्या आहेत. आज मालदाड रोड येथील एक ७२ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र हा मृत्यू कोरोनाने नव्हे तर ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र तिला कोरोनाची बाधा झालेली असल्यामुळे आता मयतांची संख्या ९ तर आणखी दोन कोरोना बाधित मिळून आल्याने संक्रमितांची संख्या ८३ वर जाऊन पोहचली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपुर्वी मालदाड रोड येथील एका ७२ वर्षीय महिलेस कोरोनाची लक्षणे आढळून येते होती. तिला श्वासोच्छवास घेण्यास अधिक त्रास होऊ लागल्याने तिला नातेवाईकांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांचे स्वॅब घेतले असता ते पॉझिटीव्ह आले होते. तिच्यावर उपचार सुरु असतांनाच या महिलेने आखेरचा श्वास घेतला. त्यानंतर जेव्हा त्यांचा मृत्युचा वैद्यकीय अहवाल आला तेव्हा ती महिला कोरोनाच्या आजाराने नव्हे तर ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने मयत झाली असे डॉक्टरांनी प्रशासनाला कळविले आहे.
आता ज्या व्यक्तीला कोरोना झाला आहे. त्यांना मृत्यू आला खरा. पण त्यांची गणना कोविड-१९ मृत्युमध्ये होते की ह्रदयविकार हे प्रशासन ठरवेल. मात्र वास्तवत: कोविडचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीच्या जवळ कोणी जात नाही आणि मयताचे पीएम केल्याशिवाय प्रॉपर कॉझ अॉफ डेथ कळत नाही. त्यामुळे प्रथमदर्शनिय जरी हा ह्रदयविकार वाटत असला तरी आता आकडेवारीवर पांघरुन घालण्यासाठी आता नवेनवे फंडे समोर येऊ शकतात. तसेही या सरकारने जनतेला गोलमाल करुन खेळते आणि गाफील ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे, जनतेने घाबरुन न जाता केवळ स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण, कितीही नाही म्हटले तरी संगमनेरची कोविड परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हे वास्तव नाकारुन चालणार नाही. आता मालेगाव आणि संगमनेर यात तुलनात्मक फारसा फरक नाही. तो अटोक्यात आणायचा असेल तर स्वयंसुरक्षा हाच एकमेव पर्याय आहे.
या महिलेनंतर आणखी मालदाड रोड व लखमीपुरा येथे कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. हा २२ वर्षीय तरुण असून तो व्यावसायीक आहे. त्यास काही दिवसांपुर्वी त्रास होऊ लागला होता. त्यामुळे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होेते. काल त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या सानिध्यात नेमके कोणकोण आले होते. त्याला बाधा कोठून झाली. याचा शोध प्रशासनाने सुरु केला आहे. सद्या प्रशासनाच्या हाती काही एक राहिले नसून केवळ संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि त्यांना क्वारंटाईन करणे किंवा त्यांची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करणे. या पलिकडे ते फारसे अॅक्टीव्ह राहतील असे चित्र सध्या दिसत नाही. त्यामुळे, तूच आहे तुझ्या जीवणाचा शिल्पकार असे समजून प्रत्येकाने स्व:ची कळजी घेणे अपेक्षित आहे.
आता एक सामान्य व्यक्ती आणि कोविड-१९ संशयीतांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा देणारी न्यूज आहे. कारण, कोरोना चाचणीसाठी आता फक्त 2,200 रुपये. तर घरुन सँपल घेण्यासाठी 2,800 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. जर यापेक्षा जास्त दर आकारल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती सरकारकडून सांगण्यात आली आहे.