पुतण्याने घातला चुलत्याच्या कानावर कुर्हाडीने घाव! अकोल्यातील घटना, चौघांवर गुन्हा दाखल
शंकर संगारे
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे शेतीच्या वादातून भावा-भावांचे भांडणे झाली होती. त्यावेळी पुतण्याने रागच्या भरात चुलत्याच्या कान व हातावर कुर्हाड मारुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना मंगळवार दि. 7 जून रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. यात दशरख श्रीपत फालके (वय 38) यांचा प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ब्राम्हणवाडा येथे फालके दशरथ फालके यांची वडीलोपार्जीत जमीन आहे. त्याचे वाटप करण्यात दोन्ही गट असमाधानी आहे. त्याचेच कारण म्हणून मंगळवारी दोन भावांमध्ये टोकाची भांडणे झाली होती. त्याहून शिवीगाळ दमदाटी सुरू होती. तेव्हा शुभांगी दशरथ फालके यांचा पुतण्या गौरव हा त्या शेतकडे आला. त्याच्या हातात कुर्हाड देखील होती. त्याने तेथे येऊन शिवीगाळ दमदाटी सुरू केली.

यावेळी पोपट फालके हा दशरथ फालके यास म्हणाला की, तुझ्या वाटणीला आलेली जमीन आम्ही पुर्वीपासून करीत आलो आहोत. आता ती तुला देणार नाही. त्यात आम्ही रोटा मारु किंवा काहीही करु असे म्हणत दमबाजी केली. त्यावेळी पोेपट फलके हा गौरवला म्हणाला की मार यांना. तेव्हा शुभांगी यांची जाव मनिषा व पुतण्या सागर फालके यांनी दशरथ फालके यांचे दोन्ही हात घट्ट पकडून धरले. तर गौरव फालके याने दशरथ फालके यांच्या कानावर कुर्हाड मारली तसेच दुसरा घाव हातावर घातला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान हा प्रकार शुभांगी व त्यांचे सासरे श्रीपाद असे सोडविण्यासाठी आले असता त्यांनी दोघांना डकलून देऊन आरोपी सागर व मनिषा यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा प्रकारची फिर्याद शुभांगी फालके यांनी अकोले पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस गौरव पोपट फालके, सागर पोपट फालके, पोपट फालके, मनिषा फालके (सर्व. रा. मुळवेरा, ब्रम्हणवाडा. ता. अकोले) आरोपींच्या शोधात आहेत. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी घटनास्थळी घाव घेत गुन्ह्याची सखोल माहिती पुढील तपासाला गती दिली आहे.
दरम्यान अकोले तालुक्यात जसे लॉकडाऊन सुरू झाले आहेत. तेव्हापासून सामुहिक बलात्कार, विनयभंग, खून, चोर्या, खुनी हल्ला, पाच ते सहा दंगे असे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना कायद्याचा धाक राहिला नाही. तसेच पोलीस ठाण्यास संख्यबळ अपूरे असून त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे. त्यामुळे, एक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक यांच्या जोरावर पोलीस ठाणे सुरू आहे. त्यामुळे, ते तरी कोठेकोठे पुरणार आहे. बाकी सर्व राम भरोसे सुरू आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षकांनी एखाद्या सहायक पोलीस निरीक्षकाची येथे नेमणुक करणे गरजेचे भासू लागले आहे.