संगमनेरात पुन्हा दोन रुग्ण शोरुम मालकास कोरोनाची बाधा! अकोल्याचाही एक सुखरूप घरी
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर शहरात आज सकाळी आणखी दोघांचा रिपोर्ट पाझिटीव्ह आला आहे. मात्र, ही दोघे कंटेनमेंट झोनमधील आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून अन्य कोणाला बाधा होईल असे नाही. यात मोमीनपुरा येथील 46 वर्षीय पुरूषाचा सामावेश आहे तर नाईनवाडपुरा येथील 50 वर्षीय महिलेचा सामावेश आहे. तसेच एक आनंदाची बातमी म्हणजे जिल्हा रूग्णालयातून आज चार जणांना कोरोनातून मुक्त करुन संगमनेरला पाठविण्यात आले आहे. तर अकोले तालुक्यातील मुंबईहून आलेला व्यक्ती बरा होऊन सुखरुप घरी पाठविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हा जो पुरूष व्यक्ती आहे. त्याचे गाड्यांचे शोरुम आहे. त्यामुळे. तेथे कितीजण येऊन गेले हे त्यांनाच माहित तर त्यांना कोणापासून बाधा झाली याचा देखील शोध घेणे आता महत्वाचे झाले आहे. तर याहून महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी महिला कोरोना बाधीत मिळून आली आहे. तिच्या घरी मासे विक्रीचा व्यवसाय आहे. यांचा मुलगा मासे विक्री करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या मुलास देखील काही प्रमाणात त्रास होत असून त्यास आता तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
यात महत्वाची बाब म्हणजे या महिलेस तपासणीसाठी आणल्यानंतर त्यांच्या घरातील व्यक्ती मासे विक्री करण्याचा व्यवसाय करीतच होती. त्यामुळे, त्यांना आता कोणाकोणाला मासे दिले. अशा शोध प्रशासन घेऊ शकते. त्यामुळे, केवळ एकाच्या बेजबाबदारपणामुळे प्रशासनाची प्रचंड शक्ती वाया जात असून त्यांची देखील मानसिकता खालावत चालली आहे. त्यामुळे प्रत्येकाने समजून वागण्याची गरज आहे.
आता प्रशासनाने एक गोष्ट करणे अनिवार्य झाली आहे. ज्या व्यक्तीला संशयीत म्हणून घेतले आहे. त्यांचे संपुर्ण घर होमक्वारंटाईन करण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसते आहे. असे झाल्यास एक व्यक्ती बाधित आहे. हे लक्षात येताच त्याची लागण दुसर्याला होणार नाही. त्यामुळे ती बाधा टाळता येणे शक्य आहे. हेच या माशावाल्यांच्या उदाहरणाहून लक्षात घेतले पाहिजे.