संगमनेरात कोरोनाचे नाबाद शतक.! कुरणमध्ये नव्याने शिरकाव.!
संगमनेर तालुक्यात कुरुण येथे कोरोनाने शिरकाव केला आहे. येथे ८५ वर्षाच्या महिलेस कोरोनाची बाधी झाली असून आज कोरोनाने संगमनेर तालुक्यात नाबाद शतक मारले आहे. त्यामुळे संगमनेर हे जिल्ह्यातील शंभरी गाठणारा पहिला तालुका ठरला आहे. तर कोणत्याही तालुक्यात नव्हे असे १० रुग्ण येथे मयत झाले आहे.

सध्या संगमनेर तालुक्याचा विचार केला तर धांदरफळ 8, निमोण 8, घुलेवाडी 1, केळेवाडी (बोटा) 1, निंबाळे 1, आश्वी बु 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, खळी 1 असे निव्वळ तालुक्यात 28 रुग्ण मिळून आले आहेत. त्यापैकी 17 रुग्ण मुळ रहिवासी 11 रुग्ण तालुक्याच्या बाहेरून म्हणजे पुणे, नाशिक आणि मुंबई येथून आलेले आहेत. यापैकी 21 रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या 85 रुग्ण तालुक्यातील असून 15 रुग्ण बाहेरील आहे. त्यामुळे कोरोनाचा आकडे 100 पुर्ण झाला आहे.
यापैकी बरे झालेल्यांची संख्या 75 असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जणांवर उपचार सुरू आहेत.