घ्या आता, संगमनेरात ऐव्हढच ऐकायचे राहिलं होतं, तीन मटका बुकींना कोरोनाची बाधा! भर लॉकडाऊनमध्ये मटका सुरू!


सार्वभौम (संगमनेर) :
                 संगमनेर शहरात एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. नवघर गल्ली येथे एक मटका किंगला कोरोना झाल्याचे उघड झाले असून तो दुसर्‍या मटका बुकीच्या संपर्कात आला होता. इतकेच काय! तो निमोण येथे जो व्यक्ती मयत झाला होता. त्याच्या संपर्कात हे लोक आल्याचे समोर येत आहे. तो मयत व्यक्ती देखील मटका चालवत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळत देखील या मटका बुकींचा पराक्रम तिघांना बाधा देऊन गेला असून कोरोनाचा आकडे वाढविण्यात यांचा फार मोलाचा वाटा असल्याच्या चर्चा आता होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या मटका आड्ड्यावर नेमके कोण-कोण गेले होते. यांच्यावर कोणाचा अंकुश आहे. याचा तपास आरोग्यविभाग आणि पोलीस प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. अन्यथा हा आकडे वाढता राहिला तर संगमनेरात फार भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
                     
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरात आता कोरोनाने अर्धशतक पुर्ण केले असून लोक वास्तव माहिती समोर आणायला तयार नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून संगमनेरचे आरोग्य अधिक धोक्यात जाऊ लागले आहे. विशेष म्हणजे यात अवैध व्यवसायीकांची फार मोठी साखळी कोरोनाने ग्रासली असावी असे बोलले जात असून आतापर्यंत संगमनेरात तीन मटका बुकींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. ही बाधा कदाचिक निमोण येथील एका मयत व्यक्तीमुळे झाली असावी अशा शोध प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, यांच्यामुळे कोणाकोणाला बाधा झाली. हे मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे. कारण, प्रशासन त्यांना दिसेल ते काम करीत आहे. मात्र, माहिती लपवून ठेवाल तर त्यात त्यांचा काय दोष? त्यामुळे झोपलेल्याला जागे करता येते. मात्र, झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येणे अशक्य आहे. या संदर्भात आरोग्य विभागाने मटका बुकीच्या घरातील काही व्यक्तींना तपासणीसाठी नेले होते. मात्र, सुदैवाने त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
नवघर गल्ली येथील जो मटका किंग हा एका खाजगी रुग्णालयात अ‍ॅडमिट असणार्‍या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. कारण हे दोघे मटका चालवितात अशी माहिती आहे. मात्र, याच्या संपर्कात आणखी एक आला होता. तो कदाचित पॉझिटीव्ह असेल असे वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. अर्थात यांचा निमोण येथील मयत व्यक्तीशी संपर्क असावा या दृष्टीने चौकशी सुरू आहे. त्यामुळे, लॅकडाऊनच्या काळात देखील संगमनेर तालुक्यात अवैध धंदा सुरू होतेे आणि आहेत हे अगदी स्पष्ट झाले आहे. इतकेच काय? अकोल तालुक्यात सुद्धा आता खुलेआम मटका सुरू आहेे. आता वर्षभर पोलिसांच्या बदल्या स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच लगाम सैल सोडले की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवांना नियम आणि अवैध धंद्यांनी अभय हा फंडा बाकी वाखान्याजोगा आहे.
संगमेनेर शहरात एकच नाही. तर आज सकाळीच दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.त्यात कोल्हेवाडी रोड येथील एक व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. तर कालच कोल्हेवाडीत हा एका संशयीत सापडलेला होता.
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547