तहसिल आणि पोलीस ठाण्याच्या आवारातून वाळुचा टॅक्टर चोरुन नेला!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुका व शहरात चोर्या, घरफोड्या व मारामार्या झाल्याचे आपण एकले होते. मंदिरात चोरी होते, घरात चोरी होते, कंपनी आणि भल्याभल्यांच्या घरात चोर्या झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, चक्क तालुक्याचे दंडाधिकारी आणि पोलीस ठाण्याच्या हाद्दीतून चोर्या होऊ लागल्याचे समोर येऊ लागले आहे. विशेष म्हणजे ही चोरी कोणी भुरट्या चोरट्यांनी केली नाही. तर चक्क वाळु तस्कराने केल्याचे बोलले जात आहे. जो ट्रॅक्टर दंडात्मक कारवाईसाठी आणला होता. तोच चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याता आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यात लॉकडाऊन चालु असताना देशही बंद होता मात्र येथील वाळुतस्करी मोठ्या प्रमाणावर सुरु होती. दरम्यानच्या काळात महसूल प्रशासन व पोलीस यांनी कारवाया केल्या त्यामुळे, वाळुतस्करांनी जरा शांतता घेतली. तरी घारगाव हाद्दीत हा प्रकार राजरोस सुरु होता. मात्र, वाहने पकडल्यानंतर हे तस्कर काही शांत बसायला तयार नाही. घटनास्थळी अर्थपुर्ण तडजोडी ज्यांनी केल्या नाही त्यांनी पकडलेली वाहणे थेट तहसिल कार्यालयाच्या परिसरात आणून लावली. आता कोविड-19 चा कालावधी सुरू असल्यामुळे त्यांच्यावर धड नजर ठेवता येत नाही ना त्यावर सुनावणी घेण्यास प्रशासनाला वेळ आहे. त्यामुळे, या तस्करांची मजल आता थेट प्रशासनाच्या घरात धुसून वाहने चोरुन नेण्याईतपत मजल गेली आहे.
एक विशेष बाब म्हणजे तहसिल कार्यालय आणि संगमनेर पोलीस ठाणे हे एकाच इमारतीत आहेत. अगदी हकेचे नाही तर अवघ्या दहा पायवलांचे अंतर आहे. तरी देखील चोरट्याची इतकी मोठी हिम्मत होते. त्यामुळे, त्या चोरट्याला खरोखर जिगरबाज असल्याचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. अर्थात हे धाडस सामान्य व्यक्ती किंवा भुरटा व्यक्ती करुच शकत नाही. कारण, आजही त्यांच्या मनात खाकी विषयी दरारा आहे. तर कायद्याविषयी धाक आहे. हे काम एखाद्या पांढर्या कपड्यातील पुढार्याच्या वरदहस्ताने झाल्याशिवाय इतकी हिंमत कोणाची होणार नाही. तसेही कोविडचा काळ सुरू असताना देखील या परिसरात साहेबांची मर्जी राखण्यासाठी अनेकजण हजेरी लावून जातात. त्यामुळे, हा काराभार राजकीय वरदहस्त असणार्या व्यक्तीनेच केलेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे वाहन चोरी गेल्याचे लक्षात येताच बाबासाहेब भाऊसाहेब नरवडे (वय 45 वर्ष धंदा कामगार तलाठी सजा चंदनापुरी तालुका संगमनेर) यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता ही कोट्यावधी रुपयांची इमारत आहे. तेथे सीसीटीव्ही देखील आहेत. मात्र, एकवेळी ते देखील गहाळ झाले तर कोणी आश्चर्य वाटू देऊ नका. तुर्तास पोलीस या घटनेचा तपास करीत आहे. एकीकडे पोलीस महसूल अधिकार्यांवर शिताफीने गुन्हे दाखल करत आहेत तर कधी महसूल अधिकारी पोलिसांना लाठ्याकाठ्यांचा प्रसाद देत आहेत. त्यामुळे, एकात एक नाही, बापात लेक नाही या म्हणीप्रमाणे सध्या प्रशासनाची गत झाली आहे.
विशेष भाग: अकोले शाबुत, राहता सेफ, संगमनेर विधानसभेला कोरोनाची बाधा!