संगमनेरात एका व्यापार्‍यासह तिघांना कोरोनाची बाधा, कोरोना शतकाच्या उंबर्‍यावर!


सार्वभौम (संगमनेर) : 
                   संगमनेर शहरात पुन्हा तीन नव्या रूग्णांची भर पडली आहे. या कुंथुनार सोसायटी येथील अ‍ॅरेेंज कॉर्नर येथे एका व्यापार्‍यास कोरोनाची लागण झाली आहे. तर नवघर गल्ली येथे एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्याच बरोबर कोल्हेवाडी रोड येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट देखील कोरोनाग्रस्त आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे संगमनेर शहरात एकच दिवशी तीन रुग्ण मिळून आले असून कोरोना बाधितांची संख्या शतकाच्या उंबर्‍यावर जाऊन पोहचली आहे.
                       
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दोन दिवस संगमनेरात कोरोनाचा एकाही रुग्ण मिळून आला नव्हता. आता मात्र, एकाच दिवशी तीन रुग्ण मिळून आले आहे. त्यामुळे, कोरोनाने त्याची सरासरी कोठा पुन्हा पुर्ण केला आहे. आता या कोरोनाची मजल थेट बड्या वसाहतींपर्यंत गेली आहे. कारण, ऑरेंज कॉर्नर येथे एका व्यापार्‍याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर नवघर गल्ली येथे एका  व्यक्तीला कोरोना झाला आहे. कारण त्याच्या घरात वडीलांना कोरोनाची बाधा झालेली होती. त्याचा संसर्ग मुलास झाला आहे.
                     
तसेच कोल्हेवाडी रोड येथे ज्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली आहे. त्या व्यक्तीच्या घरात त्याच्या भावास कोरोनाचा संसर्ग झालेला होता. त्यामुळे हा व्यक्ती कोरोना बाधित निघाला आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे, एकाची बाधा दुसर्‍याला होऊन कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून ती तीसर्‍या स्टेजमध्ये प्रबळ होत चालल्याचे दिसते आहे. त्यामुळे बाहेरुन येणारी व्यक्ती आणि संपर्कात आलेला संशयीत संसर्ग लपवू नको. त्याची माहिती प्रशासनाला द्या.
                               
यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे संगमनेर म्हणजे फार मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर व्यापारी वर्ग आहे. तो संगमनेरचा एक कणा असून त्यांनी बाजारपेठात स्वत:ची काळजी घेणे अपेक्षीत आहे. दुकानात येणारा ग्राहक देव असला तरी त्यांची काळजी घेण्यासाठी बाहेर सॅनिटायझर ठेवा. त्यांना मास्क वापरण्याच्या सुचना करा. सोशल डिस्टन्स ठेवण्याचा अग्रह करा. कारण, त्यांच्यामुळे आपला देखील बचाव होईल आणि ग्राहकांचा देखील. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
                      सुशांत पावसे