संगमनेरात आज चार कोरोना बाधित रुग्ण, एक युवती मयत!

 सार्ववभौम (संगमनेर) :- 
              संगमनेर शहरातील राजवाडा येथे कोरोनाचा १० वा बळी गेला आहे. हा परिसर कंटेनमेंट  झोन असताना ही महिला कोरोना बाधित असल्याचे समोर आले होेते. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. दोन दिवसापासून या महिलेस प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे तिच्यावर उपचार सुरु असतानाही कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेस दोन्ही बाजुंनी निमोनिया होता. त्यामुळे, त्यांच्या आजाराची रिकवरी होऊ शकली नाही. आज या ३८ वर्षीय महिलेने अखेरचा श्वास घेतला आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे या महिलेच्या संपर्कातील जवळजवळ सर्वच अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. त्यामुळे, येथे कोणाला धोका नाही. मात्र प्रत्येकाने सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
       दरम्यान आज सकाळपासून चार कोरोना बाधित रुग्ण संगमनेरात आढळून आले आहे तर २० च्या दरम्यान जिल्हाभर रुग्ण मिळून आले आहे. त्यामुळे, कोरोना मिटण्याचे चिन्ह धुसर होत चालले असून स्वयंसंरक्षण  हाच एक उपाय असल्याचे दिसते आहे.