बाबो.! घारगाव मंडळअधिकारी व तलाठ्यास शो-कॉझ नोटीस! कामात कसूर,7 दिवसात उत्तर द्या! अन्यथा...
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे स्वामित्वधन न भरता बेकायदेशीर रित्या गौणखनिज चोरी होत असल्याची तक्रार एका समाजसेवकाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली होती. त्याचा जाब प्राताधिकार्यांना विचारला असाता ते जाम भडकले आहेत. नेमकी पठार भागाहून वारंवार अशा प्रकारच्या चोर्या वारंवार का होतात? त्यांना सांगून देखील त्यांच्यावर कारवाई का होत नाही? येथून वारंवार तक्रारी का येतात? असे जाब त्यांना तहसिलदार यांना विचारला आहे. त्यामुळे तहसिलदार यांनी घारगावचे मंडळअधिकारी व तलाठी मॅडम यांना शो-कॉझ नोटीस बजावली आहे. त्यामुळे, महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पठार भाग म्हटलं की पिण्याला पाणी नाही मात्र, नैसर्गिक साधन संपत्तीची अमान लुट डोळ्यासमोर उभी राहते. तर दुसरीकडे दोन तालुक्यांचे पालकत्व लाभल्याने हा भाग खरोखर वंचित राहिला आहे. मात्र, येथे ठराविक लोकांचा मक्तेदारी असल्यासारखे काही लोकप्रतिनिधी वागतात. त्यामुळे येथील जमिन आणि वाळु तस्करी मोठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे, एका पत्रकाराने यावर आवाज उठवत थेट जिल्हाधिकार्यांकडे एक अर्ज दाखल केला होता. त्यात घारगाव गट नं. 246 मधील खाजगी मालकीच्या डोंगरावर राजरोस मुरूम उपसा होत आहे. तो घारगाव बस स्थानक परिसरातील खाजगी मालकीच्या क्षेत्रात टाकला जात होता. त्यासाठी संगमनेर तहसिलची कोणतीही परवानगी नव्हती. त्यामुळे, शासनाच्या तिजोरीत जो रेव्हेन्यु जायचा तो गुंडाच्या तिजोरीत जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तीला शासकीय नियमानुसार दिडपट दंड करावा असे सुचित करण्यात आले होते.
दरम्यान जिल्हाधिकार्यांकडून हा कागद थेट प्रांताधिकार्यांच्या कार्यालयात येऊन धडकला. त्यांनी याबाबत संगमनेर महसूल प्रशासनाला विचारणा करत प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तहसिलदार यांनी घारगाव मंडळ अधिकारी बाबासाहेब दातखिळे व तलाठी योगिता शिंदे यांना शासकीय भाषेतील खरमरीत पत्र लिहीले आहे. की, तेथे जो बेकायदा कारभार चालु आहे त्याबाबत आपल्याला वेळोवेळी सुचना देण्यात आल्या होत्या, तरी देखील आपण त्याकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात येत आहे. ही तक्रार पाहता आपण आपल्या कामात कसूर केल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ही नोटीस प्राप्त होताच सात दिवसात सक्षम लेखी खुलासा सादर करावा तसे न झाल्यास आपले काही एक म्हणणे नाही असे गृहीत धरुन आपल्यावर कारवाई केली जाईल. ...कळावे.!दरम्यान पठार भागावर नियमित अनेक अधिकार्यांना मारहाण, शिवीगाळ तसेच धक्काबुक्की झाली हे आपण नेहमी एकतो. मात्र, याची कारणे काय आहेत? एकदा अर्थपुर्ण तडजोड होते ती वारंवार होत नाही. त्यामुळे हे अवैध व्यवसायीक कंटाळून आरोरावीच्या भाषेचा वापर करतात. तर कधी महसूल काना डोळा करते तेथे खाकी आडवी येते. त्यामुळे, कोणाकोणाची बोळवण करायची असा प्रश्न यांना पडतो. तर महत्वाचे म्हणचे भलेभले वाळुतस्कार रग्गड पैसा कमवितात आणि त्यासाठी मागासवर्गीय लोकांना हाताशी धरुन अधिकार्यांवर धावून जायला सांगतात. तर काही वेळा अर्थपुर्ण व्यवहार न झाल्यामुळे तु-तू मै-मै होते आणि मग शाब्दीक चकमकी, 353, 307, 504, 506 अशा प्रकारचे गुन्हे सरकारी कुशीतून वर येतात. मात्र, अधिकारी जर तुकाराम मुंडे यांच्यासारखा पहिल्यापासून खमक्या असेल तडजोड्या नसेल तर त्याच्यावर असले फालतू आरोप होणार नाही. ना त्याच्यावर मार खाण्याची वेळ येते.!
गेल्या दोन दिवसांपुर्वीच घारगाव परिसरात एका अधिकार्याची गच्ची धरली. भर रस्त्यात आडवून वाळु उपसा करणार्या मजुरांनी लाखो रुपयांची अलीशान गाडी आडवून धक्काबुक्की करत दमबाजी केली. ही इतकी हिंमत त्यांच्यात आली कोठून? असेच कोणी चूक नसताना भर रस्त्यात अडवून धमकविण्यासाठी अजून तरी संगमनेरचे बिहार झाले नाही. ना लोकशाही सोडून हुकूमशाही आली आहे. त्यामुळे, लोकांचा आजही लोकशाहीवर विश्वास आहे. फक्त अधिकारी धुतल्या तांदळासारखा असावा. त्याच्या कॉलरला ज्या दिवशी कोणी हात घालेल त्या दिवशी कायदा हारला असेच म्हटले तर वावघे ठरणार नाही.
आता तहसिलदारांनी दोन अधिकार्यांना नोटीसा काढल्या आहेत. त्याचे उत्तर काय येते हे पाहणे महत्वाचे आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचविते की, कारवाई करते हे पहाणे महत्वाचे आहे.
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. राजूर : 9011223312 अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547