संगमनेरात गुंजाळवाडी एक कोरोना बाधित तरुण, प्रशासकीय मोहिम सुरु.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे एक ३४ वर्षीय तरुण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसापुर्वी त्यास त्रास होऊ लागल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्याचा रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे, काल नव्याने इंदिरानगर तर आज नव्याने गुंजाळवाडी येथे रुग्ण मिळून आले आहे. या प्रकारामुळे, स्थानिक व्यक्तींना बाधा होण्याचे प्रमाण वाढते असून ही केवळ माहिती लपवून ठेवल्याचे परिणाम असल्याचे बोलले जात आहे. आता प्रशासनाने गुंजाळवाडी परिसराकडे धाव घेतली असून या व्यक्तींच्या संपर्कात असणाऱ्यांची माहिती घेणे सुरु केले आहे. अशी माहिती जिल्हा प्ररशासनाने दिली. या रुग्णानंतर प्रशासकीय आकडा ८० वर तर खागजी आकडा ९० वर गेला आहे.
(जिल्हा प्ररशासनाकडून आलेल्या माहितीनुसार हा रुग्ण राजापूर असे सांगण्यात आले आहे. तर स्यथानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार तो गुंजाळवाडी येथील आहे. तुर्तास गुंजाळवाडी येथे रहिवास असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे)