गाडी घेऊन चाललो तुला काय करायचे ते कर.! संगमनेरात पोलिसाला धक्काबुक्की, मायलेकावर गुन्हा दाखल
Sagar Shinde
सार्वभौम (संगमनेर) :
कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संगमनेर शहरात सौभाग्य मंगल कार्यालासमोर मालदाड रोड येथे पोलिसांनी फिक्सपॉईंट लावला होता. तेथे तीन पोलिसांच्या ड्युट्या लावण्यात आल्या होत्या. त्यावेळी एक महिला व तिचा मुलगा येथे आला. त्यांना पोलिसांनी आडविले असता तुम्ही आमची गाडी कशीकाय पकडली? आम्ही गाडी घेऊन चाललो. तुला काय करायचे ते कर असे म्हणत या दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवार दि. 16 जून रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण मारुती शिंदे (वय 12) व सुमनबाई मारुती शिंदे (वय 50, दोघे रा. शिवाजीनगर, ता. संगमनेर) ही दोघे एम.एच17 बी.टी 3363 या दुचाकी वाहनाहून चालले होते. मालदाड रोड येथे असताना तेथे त्यांना फिक्सपॉईंट वरील पोलीस नाईक लबडे, पोलीस कॉन्स्टेबल आजबे व पोलीस नाईक संदिप देवराम बोटे (वय 38) यांनी त्यांना अडविले. देशात कोेरोनाचा प्रादुर्भाव होऊन नये म्हणून राज्यात सायंकाळी 5 नंतर सर्व बंद आहे हे माहित असताना आपण कोठे चाललात? त्यात तुमच्या तोंडाला मास्क देखील नाही. शहरात आधिच कोरोनाचे रोज रुग्ण मिळून येत आहे. यानंतर लक्ष्मण व पोलीस यांच्यात शब्दीक चकमक झाली. त्यानंतर मुलावर पोलीस भारी भरत असल्याचे लक्षात येताच त्याच्या आईने पोलिसांना प्रश्नांवर प्रश्न विचारणे सुरू केले. तुम्हाला आम्हीच दिसलो का? बाकी लोक फिरत नाही का? असे म्हणत त्यांनी पोलिसांना त्यांच्या कर्तुत्वाची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न सुरू केला. आता एकतर राज्यात 2 हजार 600 पेक्षा जास्त पोलीस कोरोना बाधित तर 30 पेक्षा अधिक पोलीस कोरोनाने मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे, उठसूठ कोणीही उठून त्यांच्यावर ताव मारायचा. त्यामुळे त्यांची मानसिकता फारशी कार्यक्षम नक्कीच राहिली नाही. त्यातल्या त्यात वरिष्ठ कधी समाधानी काही, घरी जाण्याची भीती, काम करुन कोणी कौतुक करायला तयार नाही. अशा अनेक कारणांनी वैतागलेल्या पोलिसांनी या मायलेकरांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले.
त्यानंतर पोलीस नाईक संदिप बोटे यांनी गाडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता वाद अधिक टोकावर गेला. त्यामुळे तुम्ही आमची गाडी पकडलीच का? आम्ही गाडी घेऊन चाललो आहे. तुला काय करायचे ते कर! त्यावेळी पोलिसांनी त्यांना विरोध केला असता संबंधित महिलेने पोलिसांना लोटून देत जोराचा धक्का दिला. त्यावेळी पोलिसांनी जी गाडी ताब्यात घेतली होती. ती बळजबरीने पुन्हा ताब्यात घेऊन ढकलत-ढकलत नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, याप्रकरणी पोलीस नाईक बोटे यांनी दोघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, मास्क न वापरणे असे गुन्हे दाखल केले आहे.
आता त्याहून महत्वाचे म्हणजे पोलिसांना पोलिसांच्याच कुटूंबाची काळजी राहिली नाही की काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. एकीकडे 3 हजार पोलीस कोरोनाशी झुंज देत आहे. त्यांचे कुटूंब जीव मुठीत धरुन बसले आहे. अशा परिस्थितीत संगमनेर पोलिसांनी ज्या शेकडो गाड्या पकडल्या आहेत. त्या पोलीस कर्मचार्यांच्या अगदी घरासमोर नेऊन लावल्या आहेत. कोणती गाडी कशी, कोणाचा स्पर्श झालेला असतो कोणाला माहित? मात्र, सगळा तालुका सोडला आणि पोलीस कर्मचार्यांच्या घरासमोर अधिकार्यांना जागा सापडली आहे. म्हणजे "घरचा भेदी, लंक दहन!" असेच म्हणावे लागेल. याच परिसरात पोलिसांची लहान मुले खेळत असतात. उन्हातान्हात बालके बाहेर आल्यानंतर नकळत गाड्यांवर सावलीला बसतात. मात्र, अचानक त्यांनी संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर कोणाकडे आहे? शहरात जानता राजा मैदान, मोठमोठी मैदाने, मंगलकार्यालये होती. तेथे या वाहनांची तजबीज करावी. असे मत पोलीस कर्मचार्यांच्या मातोश्री, पत्नी आणि पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या कर्मचार्यांमध्ये ही दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यावर पोलीस अधिक्षक ते पोलीस निरीक्षक यांच्यापैकी कोणत्याही वरिष्ठ अधिकार्यांनी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
सार्वभौम (संगमनेर) :
कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संगमनेर शहरात सौभाग्य मंगल कार्यालासमोर मालदाड रोड येथे पोलिसांनी फिक्सपॉईंट लावला होता. तेथे तीन पोलिसांच्या ड्युट्या लावण्यात आल्या होत्या. त्यावेळी एक महिला व तिचा मुलगा येथे आला. त्यांना पोलिसांनी आडविले असता तुम्ही आमची गाडी कशीकाय पकडली? आम्ही गाडी घेऊन चाललो. तुला काय करायचे ते कर असे म्हणत या दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवार दि. 16 जून रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण मारुती शिंदे (वय 12) व सुमनबाई मारुती शिंदे (वय 50, दोघे रा. शिवाजीनगर, ता. संगमनेर) ही दोघे एम.एच17 बी.टी 3363 या दुचाकी वाहनाहून चालले होते. मालदाड रोड येथे असताना तेथे त्यांना फिक्सपॉईंट वरील पोलीस नाईक लबडे, पोलीस कॉन्स्टेबल आजबे व पोलीस नाईक संदिप देवराम बोटे (वय 38) यांनी त्यांना अडविले. देशात कोेरोनाचा प्रादुर्भाव होऊन नये म्हणून राज्यात सायंकाळी 5 नंतर सर्व बंद आहे हे माहित असताना आपण कोठे चाललात? त्यात तुमच्या तोंडाला मास्क देखील नाही. शहरात आधिच कोरोनाचे रोज रुग्ण मिळून येत आहे. यानंतर लक्ष्मण व पोलीस यांच्यात शब्दीक चकमक झाली. त्यानंतर मुलावर पोलीस भारी भरत असल्याचे लक्षात येताच त्याच्या आईने पोलिसांना प्रश्नांवर प्रश्न विचारणे सुरू केले. तुम्हाला आम्हीच दिसलो का? बाकी लोक फिरत नाही का? असे म्हणत त्यांनी पोलिसांना त्यांच्या कर्तुत्वाची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न सुरू केला. आता एकतर राज्यात 2 हजार 600 पेक्षा जास्त पोलीस कोरोना बाधित तर 30 पेक्षा अधिक पोलीस कोरोनाने मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे, उठसूठ कोणीही उठून त्यांच्यावर ताव मारायचा. त्यामुळे त्यांची मानसिकता फारशी कार्यक्षम नक्कीच राहिली नाही. त्यातल्या त्यात वरिष्ठ कधी समाधानी काही, घरी जाण्याची भीती, काम करुन कोणी कौतुक करायला तयार नाही. अशा अनेक कारणांनी वैतागलेल्या पोलिसांनी या मायलेकरांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले.
यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजवर पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपाधिक्षक यांनी पोलिसांना कारवाया करण्याचे काही टारगेट ठरवून दिले आहे. त्यापोटी अचानक पोलीस रस्त्यावर उतरतात आणि वाहनांना ताब्यात घेतात. मात्र, लॉकडाऊन झाल्यापासून ते आजवर जितकी वाहने शहर पोलीस, वाहतूक पोलीस आणि अन्य पथकांनी पकडली आहेत त्यांची गोळाबेरीज करून तितक्या गाड्या पोलीस ठाण्याच्या व वसाहतीच्या आवारात लावलेल्या आहेत का? यांची चौकशी केल्यास फार मोठी धक्कादायक माहिती समोर येईल.कारण, एकाने पकडायच्या आणि दुसर्याने "अर्थ"पुर्ण "तडजोडी" करुन सोडून द्यायच्या. त्यामुळे, "ज्याचा वशीला तोच काशिला" सामान्य शेतकरी, मजूर, कामगार यांच्या गाड्या मात्र तेथे धुळ खात पडल्या आहेत. त्यामुळे, जर पोलीस अधिक्षकांनी ही चौकशी केली तर खरोखर "शेतच कुंपन खातय" हे लक्षात येईल. त्यामुळे काही अधिकारी व कर्मचारी हे भर उन्हातान्हात कारवाया करीत आहेत. तर काही महाशय पोलीस ठाण्यात बसून वशीलेबाजीच्या गाड्या "करकरीत कागदे" घेऊन सोडून देत आहे. त्यामुळे, लोक जसे लॉकडाऊनला वैतागले आहेत. तसेच पोलिसांच्या या "दुटप्पी व भेदभावाला" देखील प्रचंड "वैतागले" आहेत. कादाचित हा वाद याच कारणाची भडास असावी असे बोलेले जात आहे.
आता त्याहून महत्वाचे म्हणजे पोलिसांना पोलिसांच्याच कुटूंबाची काळजी राहिली नाही की काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. एकीकडे 3 हजार पोलीस कोरोनाशी झुंज देत आहे. त्यांचे कुटूंब जीव मुठीत धरुन बसले आहे. अशा परिस्थितीत संगमनेर पोलिसांनी ज्या शेकडो गाड्या पकडल्या आहेत. त्या पोलीस कर्मचार्यांच्या अगदी घरासमोर नेऊन लावल्या आहेत. कोणती गाडी कशी, कोणाचा स्पर्श झालेला असतो कोणाला माहित? मात्र, सगळा तालुका सोडला आणि पोलीस कर्मचार्यांच्या घरासमोर अधिकार्यांना जागा सापडली आहे. म्हणजे "घरचा भेदी, लंक दहन!" असेच म्हणावे लागेल. याच परिसरात पोलिसांची लहान मुले खेळत असतात. उन्हातान्हात बालके बाहेर आल्यानंतर नकळत गाड्यांवर सावलीला बसतात. मात्र, अचानक त्यांनी संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर कोणाकडे आहे? शहरात जानता राजा मैदान, मोठमोठी मैदाने, मंगलकार्यालये होती. तेथे या वाहनांची तजबीज करावी. असे मत पोलीस कर्मचार्यांच्या मातोश्री, पत्नी आणि पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या कर्मचार्यांमध्ये ही दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यावर पोलीस अधिक्षक ते पोलीस निरीक्षक यांच्यापैकी कोणत्याही वरिष्ठ अधिकार्यांनी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
दरम्यान समनापुर चौफुला येथे जे बॉरिगेटस लावले होते त्याला धडकून ज्ञानदेव दादा खैरनार (रा. कोपरगाव) यांचा मृत्यु झाला आहे. खैरनार यांच्या गाडीची लाईट अचानक बंद पडल्यामुळे त्यांना ते दिसून आले नाही. परिनामी ते धडकून त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे संगमनेर पोलीस ठाण्यात त्यांच्यावरच त्यांच्या मृत्युबाबत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे, घरातून बाहेर पडताना शहर, गाव आणि सिमारेषांवर पोलिसांनी बॅरिगेटस लावले आहे. ते पाहून वाहने चालवा. शक्य असेल तर रात्रीचा प्रवास टाळा, लॉकडाऊनचे नियम पाळा, काम नसले तर घरी बसा. अन्यथा 2020 आपल्याला फार मोठा धडा शिकवू शकते.जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547