पुण्याला पत्नीस भेटण्यासाठी गेलेल्या संगमनेरच्या नायब तहसिलदारास कोरोनाची बाधा, पत्नी निगेटीव्ह! तक्रार दाखल!


सार्वभौम (संगमनेर) : 
                संगमनेरात एक नायब तहसिलदार यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी काही दिवसांपुर्वी पुण्याची वारी केली होती, कारण त्यांची पत्नी पुण्यात वैद्यकीय क्षेत्राशी संलग्न असलेल्या एका क्षेत्रात कामास आहे. हे अधिकारी त्यांच्याकडे जाऊन आल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यासाठी ते एका खाजगी रुग्णालयात गेले होते. त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी ही माहिती सरकारी डॉक्टरांना दिली होती. मात्र, हे अधिकारी तिकडे न जाता आणखी दुसर्‍या रूग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्यानंतर एका खाजगी अहवालानंतर त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील निवासी नायब तहसिलदार हे कुटुंबास भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. दरम्यान त्यांना प्रवासात कोठेतरी बाधा झाली मात्र ते त्यांच्या लक्षात आले नाही. ते संगमनेराला आले असता त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांनी एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली. दरम्यानच्या काळात ते चार दिवस कार्यालयात गेले नाही. यावेळी त्यांना जास्तच त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी एका खाजगी रूग्णालयात तपासणी केली. मात्र त्यांना बरे वाटले नाही. नंतर त्यांनी रायते परिसरातील एक रुग्णवाहीकी घेऊन थेट पुणे गाठले. तेथे त्यांचे स्वॉब घेतले असता आज ते रिपोर्ट पॉझिटीव्ह मिळून आले आहेत. ते सध्या पुण्यात उपचार घेत आहेत. आता त्यांच्या सानिध्यात असणार्‍या व्यक्तींचा शोध सुरू झाला असून एक सुदैवाची गोष्ट अशी की, त्यांच्या पत्नीची तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.
               
  आता हे पुण्याला गेले कसे, त्यांना परवानगी दिली कोणी, यांनी सुट्टी टाकली होती का? त्यांच्याकडे बाहेर जिल्ह्यात जाण्यायेण्यास परवाना होता का? त्यांनी शासकीय ओळखपत्राचा गैरवापर केला का हे सिद्ध झाले तर त्यांच्या अडचण वाढणार आहे.
दरम्यान संगमनेर शहरात रेडझोन असताना काही अधिकारी नाशिक येथे ये-जा करीत होते. त्यात देखील एका नायब तहसिलदारांचा सामावेश होता. त्याबाबत एका समाजसेवकाने जिल्हाधिकारी तसेच सरकार दरबारी पुराव्यासह तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे तेव्हा अधिकार्‍यांच्या करवी कोरोनाने शहरात प्रवेश केला नाही. मात्र, त्याच कार्यालयातून पुण्यातून मात्र शहरात संक्रमण झाले आहे.