ऐका हो ऐका..! कोविडवर जालीम उपाय! संगमनेर व अकोले प्रशासनाने धाडला निरोप!
सार्वभौम (संगमनेर/अकोले) :
गेल्या अडिच महिने देश बंद होता. आता जनजीवन पुर्वपदावर येत आहे. तर अनेकांनी शहरे सोडून गावाकडे राहणे पसंत केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसात संगमनेेर व अकोले या तालुक्यात पुणे, नाशिक व विशेषत: मुंबई येथून आलेल्या पाहुण्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होऊ लागला आहे. त्यामुळे स्थानिकांना बाधा होऊ लागली आहे. मात्र, कोणी कोठे जावे हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. मात्र, जो कोणी आता गावाला येईल, त्याला कंपलसरी 14 दिवसांचे क्वारंटाईन करणे बंधनकारक असणार आहे. असे झाले नाही. तर त्याच्यामुळे संपुर्ण गाव 14 दिवसासाठी बंद (कंटेनमेंट) करण्यात येऊ शकते. त्यामुळे या नियमाला गांभीर्याने घेऊन गावासाठी नव्हे तर गल्लीसाठी एक नवी समिती तयार करण्यात यावी. त्यांनी त्या कॉलनी किंवा परिसरावर निगराणी ठेवावी. सद्या स्थानिक व्यक्तींना बाधा झाल्याचे प्रमाण फार कमी आहे. एव्हाना ते अकोल्यात नाही देखील. मात्र, याच्यावर आपण आज-उद्या नियंत्रण मिळवू शकतो. परंतु बाहेरुन येणार्यामुळे त्याचे प्रमाण झपाट्याने वाढेल. एका व्यक्तीमुळे संपुर्ण गाव, तालुका आणि जिल्हा धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे आता एकच जलीम उपाय आहे. गावात गल्लोगल्ली समिती करणे, कोणी बाहेरुन आला तर 14 दिवस क्वारंटाईन करणे, स्वत:ची काळजी घेणे ही दक्षता आपल्या उद्याच्या आयुष्याची तिजोरी असणार आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येकासाठी हा निरोप तातडीने धाडला आहे.
प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी ही बातमी वाचत असणार्या प्रत्येक कोविड योद्ध्याला विनंती करत संबोधित केले आहे की, आपणास सर्वांनाच माहित आहे की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे होणारा कोविड19 हा आजार जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक साथरोग म्हणून घोषित केलेला आहे. त्याला रोखण्यासाठी आपण अनेक कठोर उपाय योजना केल्या आहेत. त्यात संपूर्ण लोकडाऊन तर कधी क्वारंटाईन, कोठे निर्जंतुकीकरण तर कोठे प्रतिबंधात्मक उपायोजना. तरीदेखील अजुनही कोरोना विषाणू संसर्गाचा धोका संपलेला नाही. आता शासनाने लोकडाऊन संपविल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका संभवतो आहे. हे तितकेच सत्य आहे. खरे पाहिले तर मागील काही दिवसातील अनुभव लक्षात घेता. मुंबई येथून येणार्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले असल्याचे आढळून आले आहे. तर त्यांच्यापासून हा संसर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या संगमनेर आणि अकोले तालुक्यात बाधा निर्माण करुन गेला आहे. हे देखील नाकारता येत नाही.इतकेच काय! यापुढे शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांना देखील त्याचा बाधा होऊ शकते. त्यामुळे, बाहेरून येणार्या नागरिकांना किमान 14 दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवल्यास संपूर्ण समुदाय आपण संसर्गापासून वाचवू शकतो. बाहेरून येणार्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकारणात न ठेवल्यास तो घरी आणि गावात फिरतो, परिणामी ते संपुर्ण घर आणि तो संपूर्ण परिसर प्रतिबंधित करावा (कंटेनमेंट) लागतो. त्यामुळे चौदा दिवसांपर्यंत संपूर्ण परिसर प्रतिबंधित असतो. या 14 दिवसांमध्ये त्या परिसरांमधून कुणासही बाहेर जाणे येणे शक्य होत नाही, तसेच या परिसरातील सर्व दुकाने सर्व व्यवहार बंद ठेवावे लागतात. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, मजूर यांचे प्रचंड प्रमाणात मानसिक हाल होते. लोकांच्या मनात घबराहट निर्माण होऊन मतभेद आणि मनभेद निर्माण होतात. त्यापेक्षा सरळ आणि साधा उपाय म्हणजे बाहेरून आलेल्या या नागरिकास संस्थात्मक अलगीकरणात ठेवल्यास असा एकही प्रश्न निर्माण होत नाही.
संगमनेर तालुक्यात कोरोनाचा आकडा 65 पर्यंत गेला आहे. त्यात तालुक्याच्या बाहेरील लोक 16 तर मुळ निवासी 48 आहेत. यातील 26 रुग्ण बरे झाले आहेत तर 30 जणांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनाच्या जन्मापासून तर आजवर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात महत्वाचे म्हणजे तालुक्यात बाहेरुन आलेल्या व्यक्तींची संख्या 20 च्या जवळपास आहे. त्यामुळे शहरात स्थानिकांना कमी तर बाहेरुन येणार्यांपासून जास्त प्रदुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे, वरील सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
तर अकोले तालुक्यात तसे पाहिले तर प्रशासनाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. कारण, येथे 16 कोरोना बाधित रुग्ण असले तरी अद्याप स्थानिक व्यक्तींना त्याची बाधा झालेली नाही. लिंगदेव, ढोकरी, समशेरपूर, पिंपळगाव खांड, वाघापूर, बारी, केळुंगण, जांभळे अशी काही गावांमध्ये रुग्ण मिळून आले होते. मात्र, तो कोविड तेथेच ठार करण्यात आकोले प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे त्यांचे आभार. मात्र, येणार्या काळात अकोले अजून सुरक्षित हवे असेल तर बाहेरून येणार्यांवर जागरुकतेचे सीसीटीव्ही लावावे लागणार आहे.
संगमनेर डॉक्टर आणि कापड व्यापारी यांच्या अर्जांची जुगलबंदी! व्यापार्याचा खुलासा सार्वभौमच्या हाती, सविस्तर वाचा रोखठोक सार्वभौम, भाग 3सागर शिंदे
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 9049247452 संगमनेर : 8308139547, 8208533006
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 52 लाख वाचक)