संगमनेरात आंबी खालसा येथे पुन्हा कोरोनाचा संशयीत रुग्ण! ना घाबरता काळजी घेण्याचे आवाहन!


सार्वभौम (संगमनेर) : 
                   संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे 45 वर्षीय एक व्यक्ती कोरोना संशयीत असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीने एका खाजगी रूग्णालयात तपासणी केली असता तो पॉझिटीव्ह मिळून आला आहे.  सध्या आता संगमनेर तालुक्याचा आकडे 85 वर जाऊन पोहचला आहे. तर या व्यक्तीस जिल्हा रुग्णालयात अधिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. एक रिपोर्ट खाजगी आला तरी सरकारी रिपोट येणे बाकी आहे.  अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे, जनतेले घाबरुन जाता स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
                         
संगमनेर तालुक्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा कोरोनाची गाडी पुढे पुश होताना दिसत आहे. शहरातील आकडेवारी स्थिर असली तरी चोरीछूपे संशयीत रुग्णांची संख्या फार असल्याचे बोलले जाते. मात्र, जरी तालुक्यात 85 रुग्ण सापडले तरी आता फक्त 13 रुग्ण संगमनेर येथे उपचार घेत  आहेत. गेल्या तीन दिवसापासून जिल्हा रुग्णालयातून नऊ रुग्ण ठणठणीत करुन सगमनेरला पाठविण्यात आले आहेत. त्यांची स्थानिक प्रशासनाने चांगली दखल घेतली असून गेल्या आठवडाभरापासून संगमनेरात कोरोनाने आपला संसर्ग अटोपता घेतल्याचे दिसते आहे.
आता पहिल्यांदा जो कोरोनाचा वाढता आलेख होता तो कमी झाल्याचे दिसते आहे. प्रशासन आता फक्त संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत असून व्यक्ती ते व्यक्ती असा संपर्क कसा टाळता येईल हेच त्यांच्या हातात राहिले आहे. त्यासाठी जनतेने अधिक सहकार्य करण्याची गरज आहे. आता या आंबी खालसा येतील व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आला होता त्यांचा शोध प्रशासनाने सुरू केली आहे. या रिपोर्ट संदर्भात आरोग्य अधिकार्‍यांना विचारणा केली असता त्यांनी रुग्णाबाबत दुजोरा दिला आहे. मात्र तरी त्यास जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिकांनी घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही.
-सुशांत पवले

जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547