1978 साली कुरकुरीला कंटाळुन पवारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले होते! हे शिवसेना काँग्रेसने विसरू नये!
सागर शिंदे
सार्वभौम (संगमनेर) :
जसे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून त्यास साडेसाती सुरू आहेे. कधी राष्ट्रवादी नाराज झाली तर कधी काँग्रेस कधी मित्रपक्ष नाराज झाले तर कधी शिवसेना. अशात कोविड-19 चे संकट महाराष्ट्रात येऊन धडकले. आता ते संकटी सावट कमी होत आले तरी सरकारमधील नाराजीनाट्य कमी व्हायला तयार नाही. मात्र, समज गैरसमज यातून इतिहासाची पुनरावृत्ती होण्यासाठी पुरक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. तुर्तास भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्याचा मानस काँग्रेसने आखला तो साध्य होत आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री हावा होता. तो हेतू साध्य झाला आहे. तर राष्ट्रवादी मात्र, हात्तीच्या पावलांनी वजिराच्या चाली खेळत आहे. अशात शिवसेनेचे खा. राऊत आणि काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांच्यात कुजबुज आणि कुरकुर सुरू आहे. हे असेच चालले तर हात्तीची पाऊले वजिराची चाल चालवून कधी राजाला पायउतार करतील हे अन्य दोघांनाही समजणार नाही. त्यामुळे, 1978 चा इतिहास पाहून या कुरकुरीने बारामतीचे डोके उठले तर महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा नवा इतिहास पहायला मिळेल असे अनेक राजकीय विश्लेषकांना वाटू लागले आहे.

त्यामुळे, शिवसेनेचे खा. संजय राऊत हे सध्या तिरपुडेंची भुमिका पार पडत असून या कुरघोडीचा आणि कुजबुचीचा उद्रेख त्यांच्या अंगलट आला नाही. म्हणजे बरे! कारण, आता परिस्थिती फार वेगळी नाही. पवार साहेब एक शांत वादळ आहे. एकदा रातोरात राजभवनाची दारे उघडी झाली होती तेव्हाचा तो एक सुचक इशारा होता असेच समजले पाहिजे. अन्यथा उद्या शिवसेना आणि काँग्रेसच्या हेव्यादाव्यात आणि नाराजी नाट्यात भर दिवसा राजभवन गलबलून जाईल. त्यामुळे, ज्यांना खाटेवर जागा मिळाली आहे. त्यांनी तेथे शांतपणे पहुडले पाहिजे, पाच वर्षे सरकार टिकवायचे असेल तर खाटेचे कुजबुजणे आणि कुरकुरणे यामुळे जनतेचे डोके उठणार नाही. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. कारण, मतदार कधी इतिहास विसरत नाही.
म्हणून अभ्यासकांना असे वाटते की, जे सरकारमध्ये धनी म्हणून बसले आहेत. त्यांनी अन्य सहकार्यांचे मत ऐकून घेतलेच पाहिजे. त्यांच्यावर टिका करुन ती चव्हाट्यावर आणण्यापेक्षा उलट चव्हाट्यातील खाट खोलत नेऊन त्यांच्या आत्मिक भावना समजून घेतल्या पाहिजे. अन्यथा दोघांच्या या कुजबुजीने जर कधी बारामतीचे डोके उठले तर त्यांच्यात जशी सरकार स्थापन करण्याची हिंमत आहे. तशी पाडण्याची आणि पुन्हा 1978 ची पुनरावृत्ती करण्याची हिंमत आहे. हे विसरुन चालणार नाही. कारण त्याकाळी तिरपुडे हे काँग्रेसच्या फार विश्वासातले होते. त्यामुळे जणुकाय तेच सरकार चालवितात की काय? अशा अविर्भावात ते वागत असे. त्यामुळे नकळत वसंतदादा पाटील यांच्यासह अनेकांमध्ये नाराजी वाढत गेली आणि त्यामुळेच की काय पवार साहेबांनी यांना वैतागून जनता दलाचे एस.एम जोशी, आबासाहेब कुलकर्णी यांच्या संपर्कात येऊन पुलोद सरकार स्थापन केले होते. त्यामुळे, इतिहास रचताना इतिहास विसरून चालणार नाही.
![]() |
साहेब.! कुठं चालले.! बसा मी आलोच.! |
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 56 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547