दोन वर्षीच्या चिमुरडीसह आईने मारली धरणात उडी! अकोल्यातील धामनवण येथील घटना, मेेल्यानंतर आईवर खुनाचा गुन्हा.! जावई चोपला!
सार्वभौम (राजूर) :
अकोले तालुक्यातील धामणवन येथे कौटुंबिक कलहातून आईने आपल्या दोन वर्षाच्या चिमुरड्या लेकीला पाण्यात बुडून ठार मारले व स्वत: देखील धरणात उडी मारुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार 1 मे रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास धामणवन येथील देवंडी धरण येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी कायद्यानुसार आईने मुलीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी केले असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कांचन पंकज सोनवणे (वय 22) तर स्वरा पंकज सोनवणे (वय 2 वर्षे) असे मयत व्यक्तींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कांचन यांचे गेल्या काही वर्षात पंकज यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, काही कारणास्तव त्यांचे ऐकमेकांशी पटत नव्हते. त्यांच्यात वारंवार वाद उभा राहत होता. कांचनच्या पतीने एकदा तिला शेततळे बांधण्यासाठी 50 हजार रुपये आणण्यास तगादा लावला होता. त्यामुळे ती फार मानसिक तणावाखाली होती. इतके पैसे कोठून आणायचे हा प्रश्न तिच्यासमोर पडला तर दुसरीकडून तिला घरात त्रास दिला जात होता. त्यामुळे, वारंवार होणार्या या वादाला कंटाळून तिने स्वत:ला संपवून घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, मी गेल्यानंतर माझ्या मुलीचे काय हाल होतील, त्यापेक्षा माझ्यासोबत तिला देखील घेऊन गेलेले योग्य राहिल अशा मानसिकतेपोटी तिने आपल्या पोटच्या गोळ्याला सोबत घेतले.
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547दरम्यान देशात लॅकडाऊन सुरू असताना गावातील शांतता लक्षात घेता तिने 1 मे रोजी पहाटे 6 वाजच्या पुर्वीच धामणवन परिसरातील देवंडी धरणाकडे धाव घेतली आणि कौटुंबिक कलहाला वैतागून तीने मुलीसोबत धरणात उडी मारली. हा प्रकार काही तासानंतर स्थानिक व्यक्तींच्या लक्षात आला, त्यानंतर त्यांनी या मायलेकींनी बाहेर काढले. मोठ्या शोकाकुल वातावरणात त्या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कायद्यावर बोट ठेवत कांचन यांची अकस्मात तर स्वरा हिचा खून केल्याप्रकरणी कांचन यांच्यावर 302 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर यात पंकज आणि अन्य व्यक्तींवर हुंडाबळीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान जेव्हा कांचन व स्वरा या दोन्ही मायलेकी घरातून निघून गेल्या तेव्हा त्यांचा शोध सुरू केला होता. त्यावेळी दोन्ही कुटूंब त्यांच्या शोधात होते. दरम्यान देवंडी धरणात दोघींचा मृतदेह दिसताच कांचकच्या माहेरच्यांना ते दृश्य पहावले नाही. त्यांनी जवळच असणारा दगड उचलुन पंकज सोनवणे यांच्या डोक्यात घातला. त्यात तो जखमी झाला आहे. याप्रकरणी निवृृत्ती दगडू सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शरद काशिनाथ कदम व मारुती काशिनाथ कदम (रा. शिसवद) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- आकाश देशमुख (राजूर)
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 49 लाख वाचक)