संगमनेरात निमगाव पागा आणि कोल्हेवाडीत कोरोनाचे दोन रुग्ण! शतकाकडे कोरानाची वाटचाल!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील पुण्याहून आलेल्या 38 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर कोल्हेवाडी रोड येथील 18 वर्षीय तरुणीला देखील कोरोना झाल्याचे अहवाल समोर आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याची वाटचाल आता शतकाकडे सुरू असल्याचे दिसत आहे. आज जिल्हा प्रशासनाने काही कोरोना बाधित आकडेवारी जाहिर केली आहे. त्यात माणिकदौंडी ता. पाथर्डी व भोयरे पठार तसेच संगमनेरचे दोन असा चौघांचा सामावेश आहे.
यात महत्वाची गोष्ट म्हणजे निमगाव पागा येथील तरुण पुण्याहून आल्यानंतर तो गावात कोणाच्या संपर्कात आलेला नाही. त्यामुळे त्याच्यापासून कोणाला बाधा होण्याचे चिन्ह धुसर आहे. तर काही आंबी खालसा येथील व्यक्तीचा रिपोर्ट आता निगेटीव्ह आला आहेगेल्या चार दिवसापुर्वी एका खाजगी लॅबमध्ये आंबी खालसा येथील एक तरुण कोरोना पॉझिटीव्ह आला होता. मात्र, आज त्याची सरकारी चाचणी केली असता तो निगेटीव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा खाजगीचा सावळा गोंधळ नागरिकांना त्रासदायक ठरल्याचे दिसू लागले आहे.दरम्यान जी लोक बाहेरुन येत आहेत. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा. आजारी असल्यास किंवा कोविड 19 ची लक्षणे दिसत असल्यास ती माहिती लापवू नको. कारण आपल्यामुळे आपल्या कुटूंबाला तर समाजाला त्याची बाधा होत आहे. असेच होत राहिले तर हा तालुका लावकर कोरोनामुक्त होणार नाही. त्यामुळे माहिती न लपविता समोर येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.