पोलीस अधिकार्याने पोलीस अधिकार्याची गाडी अडविली आणि सन्मानाने दोन हजार रुपये घेतले! सल्युट त्या खाकीला!
sagar shinde
संगमनेर (सर्वभौम) :
परीक्षा बेइमानांमुळे घ्यावी लागते अन्यथा खाकीच्या वर्दीवर शंका आणि शिंतोडे उडविण्याची ताकद कोणाची झाली असती का? जर प्रमाणिक पोलीस अधिकारी खात्यात पाय रवून उभे राहिले असते तर. पण, एका नासक्या अंब्याचा कलंक परत-पसरत जातो आणि आख्खी आढी खराब होऊन जाते. तसेच काहीसे वर्दीचे आहे. पण, काही तोडक्या लोकांमुळे वर्दीवर शिंतोडे उडत असले तरी संजय कवडे यांच्यासारखे अनेक अधिकारी खकी झेंडा घेऊन खाकीच्या सन्मानार्थ प्रत्येक परिक्षा देण्यास तयार आहे. म्हणून तर त्यांच्या पाठीवर हात ठेवत साहेबांनी दोन हजार रुपयांचा इनाम बहाल केला आहे.
खरंतर कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर व आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्यांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस मैदानात उभे आहेत. पण, जेवढे कौतुक डॉक्टरांच्या वाट्याला आले तेवढे पोलिसांच्या पडल्याचे दिसत नाही. कोरोनाचा रुग्ण बरा करण्यास त्यांचा वाटा राहत नसला तरी त्यांचा प्रसार नियंत्रित ठेवण्यात त्यांचा सिहांचा वाटा आहे. हे विसरुन चालणार नाही. कारण, कारण बाधा झालेल्यांवर उपचार डॉक्टर करतात, मात्र, बाधा होऊच नये यासाठी पोलीस काम करतात. वास्तवत: कोरोनाच्या लढाईत समोरासमोर युद्ध करणारा एकमेव योद्धा म्हणजे तो पोलीस आहे. म्हणून तर आज 2 हजार 709 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 30 पोलीस दगावले आहेत. त्यामुळे, संजय कवडे यांच्यासारखे प्रमाणिक काम करणारे, न थकता व कोणताही युक्तीवाद न करता देशसेवा करणार्या प्रत्येक कोविड योद्ध्यास रोखठोक सार्वभौमचा सलाम!!

खरंतर मावळ्यांच्या पंखात बळ भरुन त्यांना लढ म्हणच्याची परंपरा आपल्या छत्रपती शिवरायांनी आणि माँ जिजाऊंनी या महाराष्ट्राला लावून दिले. त्यांच्याच इतिहासाची पाने वाचून आज सामान्यातील अतिसामान्य लोक बडेबडे अधिकारी झाले आहेत. त्यांनी देखील तीच परंपरा आजवर कायम ठेवली आहे. चांगल्या कामाचे कौतुक करुन त्यांना बक्षिस द्यायचे. ते भलेही शुल्लक रकमेचे असो, पण त्यातून निर्माण होणारे बळ बाकी दहा हात्तींसारखे असेत. असाच एक प्रसंग संगमनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे यांच्यासोबत घडला.त्याचे झाले असे की, अगदी गेल्या आठवड्यात संगमनेर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चेकपोस्टवर संजय कवडे यांची ड्युटी लावली होती. त्यामुळे ते रस्त्यावर नजर रोखून उभे होते. जान जाऐं लेकीन शान न जाऐ.! हा त्यांचा मुळत: स्वभाव. त्यामुळे, कोणी आले कोणी गेले तरी ते नियमात! जो कोणी हिटलर असेल तो त्याच्या घरी. अंगावर वर्दी चढविली की कायद्याच्या चौकटीत राहून बोलायचे. त्यामुळे, अन्य व्यक्तींवारखे नाही चल कोपर्यात आणि घाल हात खिशात. त्यामुळे त्यांच्यासमोर सगळे समान असतात.
त्या दिवशी बंदोबस्त चेक करण्यासाठी अचानक पोलीस अधिकारी तेजश्री पाचपुते यांनी एक फंडा वापरला. त्यांनी साध्या गणवेशात विना परवाना तेथे आल्या. नाना प्रकारची कारणे सांगत विनंत्या करु लागल्या. पण, कायद्यात नाही तर प्रवेश कसा मिळणार? त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कवडे यांनी त्यांना समजून सांगत पुन्हा नाशिकला जाण्याची विनंती केली. त्यांच्याकडून कोणताही अपशब्द किंवा आरेरावीची भाषा पुढे आली नाही. त्यामुळे खरोखर वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांनी पाठ थोपटली. त्यांच्या या कामगिरीची प्रशंस्था करून त्यांना 0दोन हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हा प्रकार कवडे यांच्यासाठी प्रचंड बळ देणारा ठरला. आपण प्रमाणिक आहोत हे जागाला ओरडून सांगण्याइतके जग सुज्ञ नाही. पण, सुज्ञ मानसांना प्रामाणिक मानसे भेटली तर ते कधीत त्यांचा अवमान करत नाही. अशा प्रकारे ते सन्मान करत असतात. त्यामुळे, नक्कीच देर हैं! मगर अंधेर नाही.एरवी पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो? हे नव्याने सांगायला नको. पोलिसांवर सतत भ्रष्टाचाराचे, कर्तव्यात कसूर केल्याचे आरोप होत असतात. ते काही प्रमाणात खरे ही आहेत. मात्र, प्रत्येकाला त्याच मापदंडात बसविणे हे मात्र योग्य नाही. कारण, घारगाव हाद्दीत आळेखिंड येथील चेकपोष्ट वरील कर्मचारी ड्युटी सोडून गोवा-गुटखा पुणे तालुक्यात पोहच करण्याची कामगिरी करतो. तर संजय कवडे, सुजाता थोरात, पप्पू कादरी यांच्यासारखे वर्दीतील प्रमाणिक लोक नांदुर नाक्यावर प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडताना दिसतात. त्यामुळे, खरोखर अशा व्यक्तींच्या कर्तुत्वाला सलाख केला पाहिजे. याबाबत त्यांचे कौतुक पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, जयश्री काळे, पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक अभय परमार, सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी केले आहे.