डोंगळे, टोमॅटो, कांद्यानंतर आता डाळींब चोरणारी गँग! दिड एकरचा बाग सुपडा साफ! तुम्हीच सांगा शेतकर्याने जगावं की मरावं!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा व खंदरमाळ अशा दोन ठिकाणांहून एकाच रात्री जवळ-जवळ एक लाखांचे डाळींब चोरी गेल्याची घटना आता उघड झाली आहे. शनिवार दि. 27 रोजी मध्यरात्री कोणीतरी चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे. या दोन्ही घटनांच्या प्रकरणी दोन वेगवेगळ्या मालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे चोर आवकाळी असून जसा माल येतो तशी त्याची चोरी करतात असे लक्षात येत आहे. त्यामुळे, शेतकर्यांने जगावं की मरावं असा प्रश्न उपस्थित केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंबीखालसा परिसरातील माळदवाडी येथे महादु सावळेराम पांडे यांनी मोठ्या कष्टाने शेतात डाळींबाचे पिक घेतले होते. झाडे लहानचे मोठे केले मात्र जेव्हा केलेल्या कष्टाला फळे आली तेव्हा त्याच्यावर भलताच कोणतरी डल्ला मारुन गेले. पांडे यांच्या डाळींबाच्या बागेतील चार सर्यांमध्ये हे चोरटे शिरले आणि त्यांना 20 कॅरेट डाळींब चोरुन नेले आहे. पांडे हे दुसर्या दिवशी मालाचा तोडा करण्यासाठी गेले असता त्यांच्या शेतात आधिच चोरट्यांना हात मारलेला होता. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचा छडा पोलिसांनी लावणे गरजेचे आहे. हे असेच चालु राहिले तर शेतकरी आता आंदोलन छेडणार आहे. कारण, कष्टाचे फळ घाम जिरोपर्यंत चोरला जात असेल तर हे शेतकर्यांनी केव्हर सहन करायचे?
तुम्हाला एक गोष्टीचे आश्चर्य वाटेल की, पांडे यांच्या उसाच्या शेतात देखील डि महिन्यापुर्वी कांद्याचे डोंगळे लावले होते. त्यावेळी त्याचे बी तयार करुन त्यांना काद्याचे उत्पादन घ्यायचे होते. हे डोंगळे लहानचे मोठे करुन ते त्यांनी वाढविले होते. पण, त्या अगोदरच चोरट्यांनी ते कापून नेले. याबाबत देखील पांडे यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. हा डोंगळचोरी प्रकार येथेच थांबला नाही. तर, पोलिसांनी कोणताही दखल न घेतल्यामुळे ही टोळी अधिक सक्रीय झाली. या घटनेनंतर याच परिसरातून आणखी दोन शेतकर्यांच्या शेतातून डोंगळे चोरी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. आंबी खालसा येथील गणपीरदरा परिसरातील ज्ञानेश्वर किसन कहाणे यांनीही शेतातील कांदा बियाणे तयार करण्यासाठी डोंगळे लावले होते. हा हातातोंडाशी आलेला घास त्यावेळी बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी डोंगळे गँगने सुपडासाफ केला होता. तसेच तर चैतन्ययपूर येथे देखील ढुमरे यांच्या शेतातून डोंगळ्यांची चोरी झाली होती.
आता ही चोरी येथेच थांबली नाही. तर, कदाचित याच चोरट्यांनी खंदरमाळ येथील भाऊसाहेब बाळाजी ठोके यांच्या डाळींबाच्या शेतात घुसून आख्खा बागच चोरुन नेला आहे. ठोके यांच्या खंदरमाळ येथील गट क्र 791 मधील 60 गुंठे तर गट क्रमांक 786 मधील एक एकर क्षेत्रातील 50 कॅरेट डाळींबाची फळे चोरट्यांनी तोडून नेले आहे. या प्रकारामुळे हे शेतकरी हतबल झाले असून मोठ्या कष्टाला चोरट्यांनी मातीत मळविले आहे. त्यामुळे, त्यांनी एक विनंती केली आहे. की, हे चोरटे एकाच गँगचे असून जसे पीक शेतात येईल त्याची चोरी ते करतात. पाथर्डी, शेवगाव, बीड अशा ठिकाणी रानडूकरे चोरी करतात, शेतातील नुकसान करतात. मात्र, येथेतर मानसं-मानसांच्या कष्टाची चोरी करीत असून अद्याप त्यांचा शोध लागत नाही. ही फार मोठी शोकांतीका आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अकोले तालुक्यातील शेतकरी श्रीकांत प्रकाश नवले (रा. अगस्ति आगार, ता. अकोले) यांच्या घराच्या समोरून एक पिकअप गाडी चोरुन नेली होती. त्यातील 80 टॅमेटॉच्या भरलेल्या जाळ्या चोरुन नेल्या होत्या. त्याचा शोध देखील अद्याप लागलेला नाही. लॉकडाऊनमुळे शेतकारी आधीच अडचणीत आहे. त्याला बळ देण्यापेक्षा आपल्याच परिसरातील लोक कष्ट न करता शेतकर्याच्या कष्टावर पाणी सोडत आहे. त्यामुळे, अशा अवकाळी भुरट्या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 62 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 400 दिवसात 560 लेखांचे 62 लाख वाचक)
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 400 दिवसात 560 लेखांचे 62 लाख वाचक)