संगमनेरात पुन्हा तीन नवे रुग्ण! कुरण कोरोनाच्या रडारवर! संख्या 109 वर...
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील कुरण येथे तीन व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे अहवाल संगमनेर प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. यात 41 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय महिला तर 51 वर्षीय पुरुष अशा तिघांचा सामावेश आहे. त्यामुळे संगमनेरात आता एकूण 109 रुग्ण झाले असून 11 जण मयत झालेले आहेत. आज दोन दिवस संगमनेर शहरात कोरोनाने शांतता स्विकारली होती. मात्र, आज अचानक तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने कुरणकडे आगेकुच केली आहे. आता कुरण बाबत प्रशासक काय निर्णय घेते हे पहाणे महत्वाचे आहे.
कुरण येथे मिळून आलेले तिघे हे कोरोना बाधितांच्या संपर्कातरल आहे. हे वास्तव असले तरी त्यांच्यामुळे आणखी कोणाला लागण झाली आहे. याचा शोध प्रशानाने सुरू केला आहे. सध्या तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 109 वर जाऊन पोहचली आहे.
त्यात संगमनेर या एकट्या शहरात 64 कोरोना बाधित असून त्यातील 60 जण मुळ रहिवासी आहेत. धांदफळ येथे 8 जण, निमोण 11, घुलेवाडी 2, केळेवाडी 1, निंबाळे 1, आश्वी बु 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, पळसखेडे 3, जोर्वे 1, खळी 1, गुंजाळवाडी 1, कुरण 6, पिंपारणे 1, साकूर 1 असा एकूण 109 रुग्ण संगमनेर तालुक्यात मिळून आले आहेत. यात 91 रुग्ण स्थानिक असून 15 रुग्ण बाहेरचे आहेत. 109 पैकी 83 रुग्ण बरे झालेले आहेत. तर 20 रूग्ण उपचार घेत आहेत आणि 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या ४४१ वर तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३०७ झाली आहे. आज दुपारी एकूण १९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात
संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०३ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत तर नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय व्यक्ती, बाग रोझा हडको येथील ३२ वर्षीय व्यक्ती, सुळके मळा येथील ३० वर्षीय पुरुष आणि २८ वर्षीय महिला, तोफखाना येथील ६ वर्षीय मुलगी, सिध्दार्थ नगर येथील ३८ वर्षीय पुरुष, माधवनगर कल्याण रोड येथील ४० वर्षीय महिला बाधित आढळून आली आहेत.
भिंगार येथील ३५ वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय आणि ३८ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत. याशिवाय आलमगीर (भिंगार) येथील ३० वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. तर श्रीरामपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, पारनेर तालुक्यातील बाभूळ वाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, जामखेड तालुक्यातील जायभाय वाडी येथील ३२ वर्षीय व्यक्ती (कल्याण वरून प्रवास करून आलेला) आणि शेवगाव तालुक्यातील आठेगाव येथील ३० वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.
आज कुरणमध्ये जे तीन व्यक्ती बाधित मिळून आले आहेत. ते स्थानिक असून त्याच्या त्यांच्या संपर्कात कोणकोण आले आहे याचा शोध सुरू झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.