संगमनेरात अडिच वर्षाच्या चिमुरड्याला कोरोनाची बाधा, दोन रुग्ण वाढले, रोग हाताबाहेर चाललाय का ?
संगमनेर :
संगमनेरात कोरोना प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही. पुर्वी तरुण आणि वृद्ध व्यक्तींना त्याची लागण होत होती. आता मात्र अवघ्या अडिच वर्षाच्या मुलास कोरोनाची लागण झाली आहे. ही चिमुरडा मोमिनपुरा येथील असून त्याच्या सोबत ३६ वर्षीय तरुणीला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ही दोघे पॉझिटीव्ह असणार्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. या दोघांच्या पॉझिटीव्हमुळे कोरोनाची संख्या ५२ वर गेली आहे.
सुशांत पावसे