अकोले तालुक्यात पुन्हा नवा कोरोनाचा रुग्ण.! बाप रे.! संख्या गेली १९ वर.!
सार्वभौम अकोले :- अकोले तालुक्यातील कोतुळ जवळ बोरी येथे अजुन एक कोरोनाबाधित व्यक्तीच्या महिला मिळुन आली आहे . ही महिला कोरोनाबाधित संपर्कात आली होती ,दोन दिवसापुर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सदर महिलेस जिल्हा रुग्नालयात दाखल करण्यात आले होते . तरी आज तीचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह प्राप्त झाला आहे ..
त्यामुळे आता अकोले तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 19 वर जाऊन पोहचली आहे ,तालुक्यात आजवर जे रुग्न मिळुन आले आहेत ते सर्वच रुग्ण बाहेरुन आले आहेत . केवळ माहिती लपविल्यामुळे हा प्रादुर्भाव झपाट्याने वाढु लागला आहे , हा आलेख कमी करण्यासाठी प्रशासनाला माहिती देणे आणि कोरोनाला गांभिर्याने घेणे फार महत्वाचे आहे . असे न झाल्यास अगदी कालपरवा एकही कोरोनाबाधित नसलेला अकोले तालुका हळु हळु कोरोनामय होऊ लागला आहे .
महेश जेजुरकर