संगमनेरात मटक्याने आकडा वाढविला! संख्या 61 वर, 17 सुखरूप!


सार्वभौम (संगमनेर) :
                             संगमनेर शहरात कोरोनाचा आकडा हा सामान्य बेजबाबदार व्यक्तीच्या बरोबरीने मटका किंग बहाद्दरांनी देखील वाढविला असल्याचे समोर येऊ लागले आहे. कारण, आता नुकत्याच आलेल्या माहितीनुसार आणखी एका मटका किंगला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर सुदैवाने 18 अहवालांपैकी 17 रिपोर्ट हे निगेटीव्ह आले आहेत. तर नाईकवाडपुरा येथे 63 वर्षीय महिला तसेच मोमीनपुरा येथे 65 वर्षीय महिला व दोडी दापुरच्या संपर्कात असलेला 59 वर्षीय व्यक्ती असे चार अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे संगमनेरात एकूण आकडा 61 वर गेला असून मट्यामुळे दोन बळी आणि सात जणांंना बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, जीव जाण्यापुर्वी आणि जीव घेण्यापुर्वी ज्यांना त्रास होत आहे त्यांना प्रशासनाला माहिती द्यावी. अन्यथा हा आकडा संगमनेर तालुक्यासाठी महागात पडले असे बोलेल जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोखठोक सार्वभौमने  संगमनेरात चालणार्‍या मटका किंगचा वाढता कोरोना आकडा  प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत 18 जणांना ताब्यात घेतले होते. तर वाबळे वस्ती येथील 300 पेक्षा जास्त व्यक्तींना क्वारंटाईन केले होत. आज सकाळी जे अहवाला आले आहेत. त्यातील 40 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाला आहे. कारण हा व्यक्ती देखील मटक्याच्या संदर्भातील आणि संपर्कातील आहे. हा प्रादुर्भाव येथेच थांबलेला नाही तर शहरातील काही टपर्‍यांवर चालणारा हा मटका आता काही घरांमध्ये चालतो आहे. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासनाला पोहचने शक्य नाही. त्यामुळे खरोखर ज्यांना त्रास होत आहे. त्यांनी स्वयं प्रशासनाला माहिती देणे अपेक्षित आहे. तर नाईकवाडपुरा येथे 63 वर्षीय महिला तसेच मोमीनपुरा येथे 65 वर्षीय महिला व दोडी दापुरच्या संपर्कात असलेला 59 वर्षीय व्यक्ती असे चार अहवाल आज प्राप्त झाले आहेत.

                           

विशेष म्हणजे मटका खेळणारे हा कोणी बडे लोक नसून अगदी सामान्य व्यक्ती आहेत. जे झोपडपट्टी आणि मध्यमवर्गाच्या सानिध्यात राहतात. त्यामुळे, त्यांना बाधा झाली तरी ते कोणाला सांगणार नाही. मात्र, आपल्यामुळे आपल्या कुटूंबाला त्याची बाधा होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. कारण, अवघ्या अडिच वर्षाची मुले, चार वर्षाची मुले यांना कोरोना काय माहित आहे? हे कोणत्या बाजारपेठेत गेले होते? मात्र, त्यांच्या सानिध्यात आपल्याच घरातील लोक आलेले असतात. त्यामुळे त्या चिमुरड्या जिवांशी खेळण्यापेक्षा आपण उपचार घेतलेले केव्हाही बरे! हे सांगण्याचे कारण असे की, संगमनेरात अद्याप छुपा कोरोना फार आहे. केवळ लोक संशयित नजरेने बघतात, नंतर अस्पृश्यासारखी वागणूक मिळते. समाज हेटाळणी करतो, रुग्णालयात योग्य उपचार होत नाही. अशा अनेक कारणांनी लोक घरात बसून आहेे. मात्र, याचा परिणाम फार मोठा होऊ शकतो. त्यामुळे काही शंका वाटत असेल तर तपासणी करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सुशांत पावसे
भाग 2
वरिष्ठांनी लेखी आदेश देऊन देखील डॉ.अमोल कर्पेंना न्याय का नाही? कलेक्टर झाले छोटे, पोलीस झाले मोठे! सविस्तर वाचा...