अकोले तालुक्यातील राजुरमध्ये संजय शुक्ला गँग दोन वर्षासाठी तडीपार! तालुक्यासाठी एसपींचा पहिलाच ऐतिहासिक निर्णय


- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) : 
                     अकोले तालुक्यातील राजूर येथे तीन जणांना  नगर जिल्ह्यासह तीन ते चार जिल्ह्यातून हाद्दपार केल्याची खळबळजनक  महिती समोर आली आहे. यात संजय अदालतनाथ शुक्ला (वय 30), राहुल अदालतनाथ शुक्ला (वय 25), विनाय अदालतनाथ शुक्ला (वय 23, सर्व रा. राजूर ता. अकोले) अशा तिघांना नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे, नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या इतिहासातील हा पहिलाच तडीपारीचा प्रकार आहे. त्यामुळे जर तालुक्याला चांगले सक्षम अधिकारी लाभले तर दारुच काय या ताक्यातून वाळु तस्करी देखील हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. हेच एक ज्वलंत उदाहरण सहायक पोलीस निरीक्षक प्पपू कादरी यांनी दाखवून दिले आहे.
                   
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील राजूर येथे शुक्ला कंपनीने फार मोठी दहशत माजविली होती. पोलिसांनी वारंवार कारवाया करुन देखील लॉकडाऊन सारख्या वेळी देखील येथे राजरोस दारु विक्री केली जात होता. त्यामुळे, गेल्या कित्तेक वर्षाचा इतिहास खंडित करण्यासाठी राजुरचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी मोठे पाऊल उचलले होते. दि. 18 मार्च 2019 रोेजी शुक्ला या संघटीत गुन्हेगारांच्या विरोधात कागदांचा दस्तावेज तयार करण्यात आला. त्यात आरोप ठेवण्यात आले की, संघटीत टोळी तयार करुन मारामारी करत दुखापती करणे, गैरकायद्याची मंडळी जमावून दहशत निर्माण करणे, सरकारी नोकरास मारहाण करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करून दमबाजी करणे, अवैध दारूचा साठा करुन त्याची विक्री करणे, चोरी करणे, शिवीगाळ करणे, सार्वजानिक ठिकाणी गैरवर्तन करणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे शुक्ला गँगवर दाखल करण्यात आले होते. या टोळीचा प्रमुख संजय शुक्ला असून त्याच्यावर अन्य दोघांना पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांना फार मोठा धक्का देत त्यांना हद्दपार केले आहे.
                 
यात संजय अदालतनाथ शुक्ला, व विनाय अदालतनाथ शुक्ला (सर्व रा. राजूर ता. अकोले. जि. अ.नगर) या दोघांना यास नगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुका तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून दिड वर्षाकरीता हद्दपार केले आहे. तर राहूल शुक्ला यास दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. संजय याच्यावर राजूर पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत तर राहुल शुक्ला याच्यावर देखील नऊ गुन्हे दाखल आहेत. तर विनय याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नाही.त त्यामुळे त्यांच्यावर कादरी यांनी प्रस्ताव दाखल केला होता. आत त्यास परवानगी मिळाली आहे.
                   
   दरम्यान हा प्रस्ताव पोलीस ठाण्यातून गेल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी चांगला पाठपुरावा केला होता. वेळोवेळी या सुनावणीसह हजर राहून त्यावर युक्तीवाद मांडला होता. तसेच लॉकडाऊनच्या काळत देखील या टोळीने राजुरमध्ये कशा पद्धतीने हैदोस घातला होता. याची माहिती त्यांनी पोलीस अधिक्षकांना दिली होती. त्यामुळे खर्‍या अर्थाने हा प्रस्ताव तत्काळ निकाली निघाला. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी यात प्रस्तावात अधिकची भर घालुन प्रबळ कागदपत्रांची पुर्तता केली तसेच त्याचा वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे राजुरच्या ग्रामस्थांना पोलीस अधिक्षकांनी एक प्रकारे सुखद धक्का तर अकोले तालुक्यातील अवैध धंद्यावाल्यांना धोक्याची सुचना दिली आहे. कारण, येथे दारुबंदी असून देखील या बहाद्दर राजरोस दारु विक्री करीत होता. त्यामुळे पोलीस देखील त्यास वैतागले होते. मात्र, त्यास स्थानिक खाकीतील कर्मचार्‍यांचा वरदहस्त होता त्यामुळे त्यांची देखील चौकशी करुन कारवाई करणे अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांनी दिल्या आहेत.
मी गेल्या काही दिवसांपासून आम्ही त्याचा पाठपुरावा करीत होता. आज खर्‍या अर्थाने यश आले आहे. माझ्या काळात मी गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही. मी त्यांचा कर्दनकाळ आहे. हे केवळ दारुच नाही तर वाळु, जूगार, मटका यांच्यासह अन्य अवैध धंद्यांना लगाम बसविण्यासाठी येणार्‍या काळात अशा प्रकारचे प्रस्ताव पाठविण्यासाठी मी अग्रही राहणार आहे. कारण, या दारुमुळे माझ्या अनेक माता भगीनिंचे संसार उध्वस्त झाले आहे. ते आता यापुढे मी होऊ देणार नाही.
- आ. डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी)
मी राजूर येथे कार्यरत असताना 19 मार्च 2019 मध्ये हा प्रस्ताव पाठविला होता. शुक्ला गँगवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांना शहानपण आले नाही. त्यानंतर पोलीस अधिक्षक यांच्याकडे 1951 चे कलम 55 प्रमाणे हा प्रस्ताव सादर केला होता. त्यात अनेक गुन्ह्यांचा उल्लेख केला होता. पोलीस खात्यात नेहमी म्हणतात, (प्रिव्हेंटीव्ह इझ बेटर द्यान केअर) म्हणजे गुन्ह्यापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला. त्यामुळे एसपी साहेबांनी जो निर्णय दिला, त्याचा राजुरला फार मोठा फायदा होणार आहे. यासाठी तत्कालीन पोलीस उपाधिक्षक अशोक थोरात यांचे फार मोठे योगदान लाभले होते.
- पप्पू कादरी (सहा. पोलीस निरीक्षक)

ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे. अन्य लोकांना यामुळे चपराख बसेल, हा प्रस्ताव मंजुर होण्यासाठी जो काळ आहे. त्यात फार उशिर होते. त्यावर तत्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच अकोल्यात जे धंदे चालतात ते पंटर ठेऊन चालविले जातात. त्यामुळे मुळ मालकावर गुन्हे दाखल होत नाही. म्हणून तर अशा प्रकारचे व्यावसाय मुळासह संपत नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्ह्यात अशा व्यक्तींना न दडविता त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन तडीपारीचे प्रस्ताव दाखल केले पाहिजे. तरच दारू ते कोणताही अवैध व्यवसाय यांच्यावर अंकुश बसू शकतो.
- हेरंब कुलकर्णी (सामाजसेवक)

राजुर गावात दारुबंदी आहे. तरी देखील अनेक केसेस दाखल आहेत. मात्र, आता ज्यांच्यावर दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांचे प्रस्ताव आजच बनविण्याचे काम सुरू केले आहे. आता यापुढे जो दोन गुन्ह्यात सापडून येईल त्याला तडीपार करण्यासाठी पोलीस कटीबद्ध राहणार आहेत. त्यामुळे शुक्लाच्या पावलावर पाऊल ठेवून तडीपार व्हायचे की सुखा-सामाधानाचे आयुष्य जगायचे हे ज्याचेत्याने ठरवायचे आहे. हा प्रस्ताव म्हणजे खर्‍या अर्थाने राजुरच्या अवैध व्यवसायीकांसाठी धोक्याची सुचना आहे. 
- नितीन पाटील (सहा.पोलीस निरीक्षक, राजूर)
-------------------------

जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------




(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 52 लाख वाचक)