त्याने कोरोनाचे युद्ध जिंकले तरी तो हरलाच! पोलीसाचे अपघाती निधन! फिरणं महागात पडलं!
सार्वभौम (अहमदनगर) :
त्या पोलीस कर्मचार्याने कोरोनाचे युद्ध जिंकले. मात्र, आयुष्याचे युद्ध हरले असे म्हटल्यास काही वावघे ठरणार नाही. कारण, त्याचे झाले असे की, मुंबईच्या सहारा पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या माधव संपत शिरसाठ (वय 28) यांना कोरोना झाला. त्यांनी त्यास फाईट देत ते युद्ध जिंकले. त्यांना डिस्चार्ज मिळाला असता ते आपल्या मायभुमी कडगाव येथे आले आणि मोकळी हावा म्हणून मुळा धरणाचा आनंद लुटून घरी जात असताना वांबोरी परिसरात यांचा अपघात झाला व त्यात ते मयत झाले. कदाचित स्वत:ला आणखी काही दिवस होमक्वारंटाईक करुन घेतले असते तर कोरोनाच्या लढाईचे चीज झाले असते...!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माधव संपत शिरसाठ हे नुकतेच काही वर्षापुवी पोलीस दलात भरती झाले होते. त्यांची नियुक्ती मुंबई येथील सहारा पोलीस ठाण्यात होती. जगावर कोरोनाचे संकट आले असता या कोविड योद्ध्याने जरा देखील कुचराई केली नाही. पहिले संकट स्वत:च्या जीवावर घेत देशाचे व जनतेचे संरक्षण केले. संकटाच्या काळात अंगावर खाकी घालुन 24 तास ड्युट्या करण्याची मानसिकता त्यांनी ठेवत अक्षरश: रस्त्यावर जेवण केले. जो दिसेल त्याला मानुसकीच्या धर्माने मदत केली. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याला प्रत्येक पोलीस जातीने मैदानात उतरला. त्यात हे एक शिरसाठ साहेब होते.
गेल्या काही दिवसांपुर्वी ते ड्युटीवर असताना त्यांना अस्वस्थता जाणवत होती. त्यानंतर दोन दिवसात श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेतले असता त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले होते. या दरम्यान अनेक पोलिसांना ही बाधा झाली होती. त्यांच्यावर योग्यवेळी उपचार करण्यात आले होते. अवघ्या काही दिवसात त्यांची पुन्हा तपासणी केली असता ती निगेटीव्ह असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर आरोग्य विभानाते त्यांच्या कर्तुत्वाला सलाम म्हणून मोठ्या दिमाखात त्यांना घरी विदा केले होते.
दरम्यान मुंबईत आराम करण्यापेक्षा त्यांनी आपल्या अहमदनगर येथील राहुरी तालुक्यातील कडगाव येथे जाणे पसंत केले. शिरसाठ येथे आले खरे. मात्र, मित्रकंपनी त्यांना घरी बसून देत नव्हती. काही दिवस नियम पाळल्यानंतर त्यांनी मोकळ्या हवेत जाऊन फ्रेश होण्याचा प्रयत्न केला. ते मुळा धरणावर गेले. तेथे त्यांना मनसोक्त मौज केली. जेव्हा घरकडे जाण्याची वेळ आली तेव्हा परतीचा प्रवास करीत असताना त्यांचा वांबोरी परिसरात अपघात झाला आणि त्यात एक कोविड योद्धाला आपला जीव गमवावा लागला.
दरम्यान पंधरा दिवसांपुर्वी राज्यात 2 हजार 709 पोलीसांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात 27 पोलीस दगावले आहेत. तर यात 245 नुसते पोलीस अधिकारी असून 17 शे पेक्षा जास्त पोलीस बरे झाले आहे. हे सर्व असताना देखील राज्यात 257 ठिकाणी लोकांनी पोलिसांवर हल्ले केले आहेत. त्यापैकी 865 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 86 पोलीस आत्तापर्यंत जखमी झाले आहेत.