संगमनेरच्या वाळुतस्करांच्या मुसक्या, अकोले पोलिसांनी आवळल्या! दोघांवर गुन्हे दाखल!


सार्वभौम (अकोले) : 
                   अकोले तालुक्यातील जाचकवाडी फाट्याजवळ बेलापूर व बोटा शिवारात वाळु तस्करी होत असल्याची माहिती अकोले पोलिसांना मिळाली होती. त्यांनी गुरूवार दि.14 रोेजी सायकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दोन वाळुतस्कारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल अस्तगत केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी अकोले पोलीस पठारभाव परिसरात तपासकामी व गस्त घालण्यासाठी गेले होते. यावेळी पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांना गोपनिय सुत्रांनी माहिती दिली की, संगमनेर बेलापूर बोटा परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळु तस्करी होते. कधी वाळु संगमनेरात जाते तर कधी पठार भागातून ती अकोल्यात सप्लाय केली जाते. हा प्रकार माहित होताच त्यांनी ठरल्या ठिकाणी सापळा लावला.
दरम्यान सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एम.एच 17 बीडी 5594 हा ढंपर वाळु वाहताना मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे आवश्यक कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाही. त्यामुळे त्यांची तपासणी केली असता त्यात साडेतीन ब्रास वाळु मिळून आली. गाडीवर असणार्‍या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव माऊली उर्फ ज्ञानदेव गोपाळा आभाळे (रा. अकलापूर. ता. संगमनेर) असे सांगितले. हा ढंपर तुझा आहे का? अशी विचारणा केली असता त्याने सांगण्यास टाळाटाळ केली. मात्र, खाकीची भाषा सुरू होताच त्याने सांगितले की, ही वाहतूक अविनाश रोहिदास डोंगरे (रा. मुंजेवाडी, ता. संगमनेर) यांच्या सांगण्याहून ही वाळु वाहिली जात आहे.
हा प्रकार लक्षात येताच पोलीस निरीक्षक जोंधळे यांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यात आणखी कोेणती साखळी आहे. याचा शोध घेण्यास सांगून तपास टोपले यांच्याकडे दिला आहे. आता या परिसरात वारंवार असे प्रकार का होता. येथेे बीट अंमलदार कोण आहे. याच परिसरातील वाहनांवर कारवाई का होते? संगमनेरच्या पठारावरील वाळुतस्कारीवर पोलिस इतके खार का खातात हे गौडबंगाल नाही तर सर्व काही उघड-उघड आहे. कारण, अकोल्यात वाळुतस्कर 25 लाखांच्या गाड्य घेऊन मिरवतात. तर अकोले तालुक्यातील नदीपात्राच्या शेजारी असणार्‍या गावांमध्ये भर दिवसा वाळु उपसा होतो. त्याकडे महसूल आणि खाकी एक डोळा बंद करुन पाहते. मात्र, गेल्या चार दिवसात पठार भागावरील दोन कारवाया बाकी शिताफीने केल्या जात आहे. विशेष म्हणजे घारगाव पोलीस ठाण्याच्या हाद्दीत अशा प्रकारच्या कारवाया महिना पंधरा दिवसातून क्वचित दिसून येतात. मात्र, कारवाई करण्याची त्यांची मानसिकता का होत नाही. हे नव्याने सांगायला नको.
दरम्यान अकोले पोलिसांनी यापुर्वी पठार भागावर वाळु तस्कराच्या मुसक्या आवळल्या होत्या. बोरी गावच्या शिवारात  ही कारवाई करुन एम.एच 17 एई 9918 हा ढंपर ताब्यात घेतला होता. ती वाळु चोरीचा असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी निवृत्ती रामभाऊ गांडाळ (रा. पिंपळगाव खांड) व धनंजय रमेश देशमुख (रा. कोतुळ) यांच्यावर गुन्हा दाखल केले होते. आज पुन्हा याच परिसरात वाळुवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, पठार भागावरील वाळुतस्कारांना स्थानिकांचा धाक नसला तरी अकोले पोलिसांमुळे त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.