संगमनेरात चार हजार लोक होमक्वारंटाईन! मटका बुकींसह 18 संशयित नगरला! 10 क्षेत्र प्रतिबंधित!


सर्वाभौम (संगमनेर) :-
                    संगमनेर तालुक्यात कोरोनाचा आकडे 55 वर जाऊन पोहचला आहे. लोक दक्षता घेत नाहीत, माहिती लपवून ठेवतात, याचा फार मोठा फटका संगमनेरला बसला आहे. त्यामुळे, अन्य तालुक्याची रहदारी सुरू झाली असली तरी संगमनेरात मात्र, अजुनही जनजीवण सुरळीत झालेले नाही. तालुक्यात अद्याप 4 हजार लोक होमक्वारंटाईन आहेत. तर आठ ठिकाणी कंटेनमेंट झोनची परिस्थिती आहे. त्यामुळे, बेजबाबदार लोकांना नेमके कधी शहाणपण यायचे हेच कळेनासे झाले आहे. सध्या शहरातील मोना प्लॉट आणि वाबळे वस्ती येथील 308 लोकांना नव्याने होमक्वारंटाईन केले असून त्यात 49 घरांचा सामावेश आहे.

संगमनेर तालुक्यातील मोना प्लॉट आणि वाबळे वस्ती, बफर झोन कोल्हेवाडी रोड, कोल्हेवाडी रस्ता पुल येथे आता 17 मे पर्यंत कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता या मितीस संगमनेर तालुक्यात दिग्रस, कौठे कमळेश्वर, मोमीनपुरा, भारत नगर हे देखील कंटेनमेंट करण्यात आलेली आहेत. यात 4 हजार पेक्षा जास्त लोक तर 531 कुटूंबांचा सामावेश आहे.
दरम्यान आज रोखठोक सार्वभौमने मटका बुकींची बातमी केली होती. त्यानंतर त्याची प्रशासनाने दखल घेत बातमीच्या दृष्टीने तपास सुरू केला. हा वेध घेत असतांना पोलीस आणि महसूल यांनी शोध मोहिम राबविली. त्यात एकूण मटका बुकांच्या संपर्कात जवळजवळ 18 लोक मिळून आले आहेत. त्यांना ताब्यात घेऊन थेट नगरला स्वॅब घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाने तपास केला असता हे लक्षात आले की, निमोण ते नवघर असा कोरोनाचा प्रदुर्भाव कसा झालेला आहे. प्रशासकीय गोपनिय माहितीच्या आधारे एक गोष्ट लक्षात आली आहे की, दोन व्यक्तींचा मृत्यु आणि तीन पेक्षा जास्त व्यक्तींना कोरोनाचा बाधा या मटका बहाद्दरांमुळे झाली आहे. अर्थात महसुलला मटक्याचे काही एक घेणेदेणे नाही. तो भाग पोलिसांचा आहे. मात्र, यांच्या बेजबादरापणामुळे कोरोनाचा प्रदुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी काही सुचना दिल्या आहेत.

महत्वाचे...!!
आता विद्यापीठे, कॉलेज व शाळा उघडणार आहे. मात्र, शिकवणीसाठी नव्हे तर केवळ कार्यालयीन कर्मचारी हे ई-सामग्री तयार करणे, उत्तर पत्रिकांचे मुल्यांकन, आणि निकाल जाहिर करणे हे कामकाज करु शकतात. यावेळी कोचिंग क्लासेस बंद रहणार असून ऑनलाईन शिकविणी सुरू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.