अकोले शहराच्या वेशीवर तर संगमनेरात सहा रुग्ण! पिंपरणे, साकुर, कुरण यांच्यासह शहराचा सामावेश!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यात आता कुरणला कोरोनाने ग्रासण्यास सुरूवात केल्याचे चित्र दिसू लागले आहे. कारण, आज रविवार दि. 28 रोजी जे अहवाल आले आहेत. त्यात कुरण येथे दोन रुग्ण, पिंपरणे आणि साकुर येथे प्रत्येकी एक तर संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमिपुरा येथे एक असा सहा बाधित रुग्ण आढळून आले. आहेत. त्यामुळे संगमनेरचा आकडा आता 107 वर जाऊन पोहचला आहे. तर मयत झालेल्यांची संख्या 11 वर आहे. त्यामुळे, संगमनेरातील कोरोना कालच्या विश्रींतीनंतर आज चौपट वेगाने पुढे गेला आहे. आज एकाच दिवशी जिल्ह्यात 12 कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
संगमनेर तालुक्याबरोबर नगर शहरात सिद्धार्थ नगर, भिंगार, नवनागापुर आणि केडगाव येथे बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी, केडगाव येथील रुग्ण ठाण्याहून आला होता. तर पारनेर तालुक्यातील गोरेगाव आणि अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव रुग्ण संख्या आता 113 झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
दरम्यान नगर जिल्ह्यातील 10 रुग्णांना आज रविवार दि.28 रोेजी डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, संगमनेर 05, नगर मनपा 02, पारनेर, नगर आणि अकोले तालुका प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 283 इतकी झाली आहे. दरम्यान आज जिल्ह्यात आणखी 12 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 06, नगर शहरात 04 तर अकोले आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
दरम्यान अकोले शहरात अद्याप एकही रूग्ण मिळून आलेला नाही. त्यामुळे, तेथील प्रशासनाला मानले पाहिजे. मात्र, आता तालुक्यानंतर कोरोना पार वेशीवर येऊन ठेपला आहे. शहरातील कांदे मार्केट परिसरात रेडे, कुंबेफळ, सुगाव, तांभोळ असा परिसर असून त्यांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. या रुग्णाचा कोठे-कोणशी कसा संपर्क आला आहे. याचा शोध स्थानिक प्रशासनाने घेणे सुरू केले आहे.
यात सर्वात महत्वाचे म्हणजे हा रुग्ण शहरातील एका पेट्रोलपंपांच्या परिसरात अॅडमिट झाला होता. त्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. मात्र, त्याला कोरोनाचे सिमटन्स आहेत याबाबत कोणतीही कल्पना आरोग्य अधिकार्यांना दिली नाही. ही माहिती त्यांनी एकदाम गोपनिय ठेवत परस्पर या व्यक्तीस नगरला पाठविण्यात आले. त्यामुळे येथील आरोग्य अधिकारी देखील या रुग्णालयाबाबत अनभिज्ञ राहिले. विशेष म्हणजे हा रुग्ण अकोले शहरातील एका व्यापार्याकडे ड्रायव्हर म्हणून आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांचे गोडावून आहे. त्यामुळे त्याचा ज्या व्यक्तीशी संपर्क आला होता. त्यास क्वारंटाईन करण्यात आले असून डॉक्टरांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता डॉक्टर हे कोविड योद्धे आहे. त्यांचा आपल्याला अभिमान आहे. मात्र, त्यांच्याकडे संशयीत व्यक्ती आल्यास त्यांनी प्रशासनाला कळविणे गरजेचे होतेे. मात्र, तसे झाले नाही. कारण, असाच प्रकार धांदरफळ येथील रुग्णबाबत घडला होता. त्यामुळे तेथे दोन मयत तर आठ स्थानिक रुग्ण कोरोना बाधित मिळून आले होते. जर हा रुग्ण परस्पर रुग्णालयात गेला नसता तर किती मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडून आपल्याला अकोल्यात कोरोनाचा प्रदुर्भाव होऊ द्यायचा नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. असे मत अकोलेकरांनी व्यक्त केले आहे.
--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 62 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547