संगमनेरात दोन कोरोना बाधित रुग्ण, शहरात 39 तर ग्रामीणमध्ये 28 रुग्ण, संख्या 73
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर शहराला एका पाठोपाठ एक कोरोनाचे धक्के देखील बसत आहे. आज बुधवार दि.10 रोजी पुन्हा दोन कोरोना बधितांच्या संख्येत नव्याने भर पडली आहे. शहरातील देवी गल्ली येथील 52 वर्षीय पुरुषाला तर जिल्हा उल्लंघन करून निफाड वारी केलेल्या 50 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल हाती आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने दक्षतेची भुमिका घेत संपर्कातील व्यक्तींची शोधाशोध मोहिम सुरू केली आहे.

दरम्यान, तालुक्यात एकुण कोरोना ग्रस्तांची संख्या 73 झाली असून त्यापैकी 22 जणांचा कोरोनावर उपचार सुरू आहेत. यापैकी मूळ रहिवासी 52असून तालुक्याबाहेरून वानवळा आणनार्यांची संख्या 21 आहे. तसेच 43 जणांनी कोरोनावर मात करून ते ठणठणीत झाले आहे. त्यांना प्रशासनाने विलगिकरण कक्षेत ठेवले आहे. तर 8 जणांना कोरोनाची लागण होऊन ते मयत झाले आहे.
तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या वाढत्या संख्येला अंकुश बसला होता. मात्र, 26 मे पासून स्थनिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणात शिथिलता दिली. त्यामुळे लोक घराबाहेर पडून विनाकारण फेरफटका मारू लागले. यामध्ये मुंबई-पुणे वारी केलेल्यांची माहिती कोणाला नसल्यामुळे त्याचा छुपा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यांच्यामुळे तालुक्यातील कोरोनाच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. आता ही आकडेवारी थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच डोके दुखी वाढली आहे.
काल शुकशुकाट पडलेले रस्ते आज वेगाने धावू लागले आहेत. विनाकारण फिरणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. लोकांना कोरोनाचा विसरपडल्याने त्याचे गांभीर्य देखील राहिलेले दिसत नाही. त्यामुळे या बेजबाबदार लोकांनपुढे प्रशासन देखील हतबल झाले आहे. त्यामुळे, पोलीस देखील तटस्थ भुमिकेत दिसत असून महसुलच्या घरात कर्त्या व्यक्तीला कोरोना होऊन तो अॅक्सिजवर असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन प्रशासनाने चांगले सन्मानित केले आहे. त्यामुळे महसुलने आत पहिल्यासारखे शितफिने काम करावे. अशी आपेक्षा त्यांच्याकडून ठेवणे क्रमप्राप्त नाही. त्यामुळे हा आकडा वाढता राहिला तरी प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्यावी. हेच जालीम उपाय आहे.
सध्या संगमनेर शहरात नाईकवाडापूरा येथे 6, रेहमतनगर येथे 6, इस्लामपूरा 2, भारत नगर 3, मदिनानगर 4, कुरण रोड 1, मोना प्लॉट व कोल्हेवाडी रोड 8, मोमीनपुरा 5 नवघरगल्ली 2, लखमीपुरा 1 देवीगल्ली 1 असे शहरात 39 रुग्ण मिळून आले आहेत. त्यापैकी 35 स्थानिक असून 22 बरे झाले आहेत. 4 तालुक्याबाहेरील असून 13 जणणांवर उपचार सुरू आहेत. तर नाईकवाडापुरा, मदिनानगर व मोमीनपुरा अशा तीन ठिकाणी शहरात प्रत्येकी एक रुग्ण मयत झाला आहे.
या पलिकडे तालुक्याचा विचार केला तर धांदरफळ 8, निमोण 8, घुलेवाडी 1, केळेवाडी (बोटा) 1, निंबाळे 1, आश्वी बु 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, खळी 1 असे निव्वळ तालुक्यात 28 रुग्ण मिळून आले आहेत. त्यापैकी 17 रुग्ण मुळ रहिवासी 11 रुग्ण तालुक्याच्या बाहेरून म्हणजे पुणे, नाशिक आणि मुंबई येथून आलेले आहेत. यापैकी 21 रुग्ण बरे झाले असून सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर धंदरफळ येथे 1, निमोण येथे 2, शेडगाव येथे 1 अशा जणांचा मृत्यू संगमनेर ग्रामीणमध्ये झाला आहे.
सुशांत पावसे