अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे दुसरा रुग्ण!

sanket samer 
सार्वभौम (संगमनेर) :
             अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे आणखी एक रुग्ण मिळून आला आहे. हा रुग्ण तेथील स्थानिक असून तो समशेरपूर ते कल्याण असा भाजीपाला घेऊन जात होता. तो अनेकदा भाजीपाला नेत होता. मात्र, दोन दिवसापुर्वी त्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे अकोेले तालुक्यातील हा स्थानिक पहिला रुग्ण कोरोना बाधित मिळून आला आहे.

अकोले तालुक्यात आजवर जे 23 रुग्ण मिळून आले होते. त्यापैकी सर्वजण पुणे, मुंबई नाशिक येथून आलेले होते. त्यामुळे आजवर एकही रुग्ण स्थानिक नव्हता. मात्र, आता समशेरपूर येथील एका स्थानिक व्यापार्‍याला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे स्थानिक अधिकारी नेमके गाव सिल करतात की संबधित क्षेत्र  हे पाहणे महत्वाचे आहे.
गेल्या महिन्यात येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तो व्यक्ती बरा होऊन घरी येतो कोठे नाहीतर आज पुन्हा समशेरपुरवर कोरोनाची तलवार पडली आहे. त्यामुळे या गावास पुन्हा कंटेनमेंट झोनला सामोरे जावे लागणार आहे.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथे तीन महिलांना तर इंदिरानगर येथे एक अशा चार महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला आहे. निमोण येथे एक 31 वर्षीय तरुणी, दुसरी 30 वर्षीय तरुणी तर निमोण येथेच 13 वर्षीय बालिकेला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेत इंदिरानगर येथे 57 वर्षीय महिलेला देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा सर्वेक्षण सुरू केले असून संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.
तर एक महत्वाची गोष्ठ म्हणजे गुंजळवाडी येथे देखील एका 57 वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाली आहे. ही महिला गुंजाळवाडीची असली तर त्यांचा रहिवास हा इंदिरानगर येथे होता. त्यामुळे प्रशासनाने शहरात धाव घेतली असून इंदिरानगर म्हणजे शहरातील बडे-बडे लोक तेथे राहतात. तर ही फार गजबजलेली वस्ती आहे. त्यामुळे जर कोणाला काही त्रास होत असेल तर ती माहिती कोणी दडवू नये. कोणी बाहेरुन आले असेल तर ती माहिती प्रशासनाला कळवावी.
- सुशांत पावसे

जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547