संगमनेरात रक्ताचा सिनेस्टाईल थरार, एकाची भोकसून हत्या तर दुसर्‍यावर वार! काल धमकी, आज ठार, वडगावची घटना


सार्वभौम (संगमनेर) : 
                         संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे रविवार दि.21 जून रोजी चिकन शॉपच्या जवळ मारामार्‍या झाल्या होत्या. तो वाद सोडविण्यासाठी गेलेल्या बाळासाहेब चत्तर हे गेले होते. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करण्यात आली. तर माझ्या वडिलांना शिवीगाळ का केली असे विचारण्यासाठी गेलेल्या मुलास देखील दगडाने  मारहाण केली. हा वाद सोडविण्यासाठी पुन्हा वडील गेले असता त्यांना शिवीगाळ दमदाटी करुन ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर सोमवारी पुन्हा वाद झाले आणि तिघांना बाळासाहेब माधव चत्तर यांच्यावर धारधार चाकुने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले तर त्यांच्या मुलावर देखील चाकुने वार करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                         
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रविण बाळासाहेब चत्तर यांनी  रविवारी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडगाव पानमध्ये त्यांच्या चिकन शॉपचे शेजारी हॉटेल साई सावली येथे देविदास हरीभाऊ काळे व एक महिला संतोष काशिद यांना शिवीगाळ करीत होते. म्हणून बाळासाहेब चत्तर हे त्यांना समजून सांगण्यासाठी गेले असता त्यांना देखील शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार प्रतिक चत्तर हे त्यांना विचारण्यासाठी गेले की, तुम्ही शिवीगाळ का करीत आहात? त्यानंतर आरोपी काळे याने त्याच्या हातातील दगड फेकून मारला असता तो प्रतिक यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर हा वाद सोडविण्यासाठी बाळासाहेब चत्तर तेथे गेले असता त्यांना आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिली व ते निघून गेले. अशी फिर्याद संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
                           
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची पोलिसांनी फारशी दखल घेतली नाही. दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवार दि. 22 जून रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास आरोपी राहूल देविदास काळे, देविदास हरिभाऊ काळे व रामा गायकवाड यांनी काल झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन चत्तर यांच्या चिकन शॉपवर आले. तेथे येऊन त्यांनी शिवीगाळ दमदाटी सुरू केली. दरम्यान यांच्यामध्ये बाचाबाची झाली असता राहुल देविदास काळे याने याच्या हातातील चाकुने बाळासाहेब चत्तर यांच्या पोटात चाकु खुपसला तसेच पाठीवर वार करीत त्यांच्यावर हल्ला केला. ते क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडले. हा प्रकार त्यांचा मुलगा प्रतिक याने पाहिला असता तो मधे पडला असता त्याच्या देखील दंडावर आणि पाठीवर वार करुन त्यास जखमी केले. यावेळी तो देखील धारतीर्थ पडला.
                         
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खून तसेच जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणातील आरोंपीच्या मुसक्या आवळल्या असून हा प्रकार म्हणजे एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा घडला आहे. खुलेआम धारधार हत्यारांनी हत्या होऊ लागल्या तर खरोखर कायद्याचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, या घटनेनंतर पोलीस उपाधिक्षक, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी घाव घेत घटनेचा पंचानामा करण्याचे आदेश दिले आहेत. यात कोणला पाठीशी न घालतो तपास करण्यात येईल. त्यामुळे कोणी कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल असे कृत्य करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.