अकोल्यातील समशेरपुर परिसरात दोेघे कोरोना बाधीत, तिघे संपर्कात, 13 जण क्वारंटाईन!
महेश जेजुरकर
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे एका दाम्पत्यास कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आज अकोले आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे, आरोग्य विभागाने तिकडे घाव घेत ते कुटूंब आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 जणांना क्वारंटाईन केले आहे. तसेच फार संपर्कात आलेल्या तिघांचे स्वॅब घेण्यासाठी संगमनेरला पाठविण्यात आले आहे. मात्र, हे जोडपे कल्याहूनच पॉझिटीव्ह होऊन आले होते. असे मत प्रशासनाने व्यक्त केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, समशेरपूर येथील ढोनरवाडी येथील एक कुटूंब कामानिमित्त कल्याण येथे राहत होते. दरम्याच्या काळात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व कामधंदा विस्कळीत झाला. मात्र, तेथे थांबून देखील त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे, समशेरपूर येथील त्यांच्या एका नातेवाईकाने एक गाडी करुन त्यांना गावाकडे आणण्यासाठी थेट कल्याण गाठले. गेल्या चारपाच दिवसांपुर्वी ते गावी आले होते. मात्र, त्यांना दोन दिवसांपुर्वी श्वास घेण्यासाठी प्रचंड त्रास होऊ लागला होता. तरी काहीतरी किरकोळ म्हणून दुर्लक्ष करण्यात आले.
दरम्यान हा त्रास जास्त झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईनांनी कोणालाही न सांगता एक दक्षता म्हणून थेट नाशिकला तपासणीसाठी नेले. तेथे दोघांचे स्वॅब घेतले असता त्या पतीपत्नीस कोरोनाची बाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आज ही माहिती स्थानिक प्रशासनाला माहित झाली. आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभीरे यांनी सकाळी ढोनरवाडी येथे जाऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर लक्षात आले की, या दोघांचाही संपर्क जनतेशी आलेला नाही. मात्र, तरी देखील एक संशय व खबरदारी म्हणून 13 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर जे या दाम्पत्यास आणण्यासाठी गेले होते. अशा तिघांचे स्वॅब घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे.
बाहेरुन येणार्या रुग्णांना तालुक्यात येण्यावाचुन कोणी आडवू शकत नाही. मात्र, त्यांनी गावात आल्यानंतर किमान स्वयंप्रेरणेना संस्थात्मक क्वारंटाईन होणे अपेक्षित आहे. तसेच जर माहिती लपवून ठेवली तर हा रोग वाढत वाढत फार रैद्ररुप धारण करु शकतो. त्यामुळे येणार्या प्रत्येकाने प्रशासनाशी संपर्क साधला पाहिजे. त्याच प्रमाणे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांनी देखील यावर कटाकक्षाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा या कमिटीवर देखील गुन्हे दाखल करण्याची तरतूद आता करण्यात आली आहे. त्यामुळे कोणी कोणाचे हितसंबंध जोपासायचे नाही तर कोरोना हटविण्यासाठी हातभार लावायचा आहे.
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 400 दिवसात 465 लेखांचे 60 लाख वाचक)