पिंपळगावच्या धरणात बुडून तरुणाचा मृत्यू, आठवड्यात दोन चिमुकले तर संगमनेरात एक तरुण बुडाला!
Aakash Deshmukh
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड या धरणात एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे. यात सुनिल मोहना घाटकर (वय 30, रा. येसरठाव, ता. अकोले) यांचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. ही बाब सकाळी काही स्थानिक व्यक्तींनी पाहिली असता त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत पंचनामा केला आहे. अद्याप घाटकर हे धरणावर कशासाठी गेले होते. याचा माहिती पोलिसांना घेणे सुरू केले आहे. मात्र, तुर्तास याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
तर रविवार दि. 21 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील करुले शिवारात सलीम जकीर पठाण (वय 18) यांचा एका शेततळ्यात बुडून मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. त्या दिवशी अचानक त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यानंतर या तरुणाला बाहेर काढण्यात आले. दरम्यान रुग्णालयात दाखल केले असता त्यास मयत घोषित करण्यात आले. मात्र, हा तेथे कशासाठी गेला होता. याबाबत अद्याप पोलिसांना काही माहित नाही. मात्र, तुर्तास संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
तर आणखी एक दुर्दैवी गोष्ट म्हणजे राहुरी तालुक्यातील गडकवाडी शिवारात बंधार्याच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्या भावा-बहिनींचा मृत्यू झाल्याची घटना अगदी याच आठवड्यात घडली होती. यात साक्षी शंकर गागरे (वय 8) व सार्थक शंकर गागरे (वय 10) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या मुलांची आई शेताला गेली असता ही दोघे चिलेपिले बंधार्यावर पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा ठाव लागला नाही, त्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी त्यांची आई कामाहून घरी आली असता तिने दोन्ही बाळांना आवाज दिला. मात्र, एकाचीही साद आली नाही. त्यानंतर तिने सगळा परिसर पिंजून काढला असता तिला बाधार्याकाठी मुलांचे कपडे मिळून आले तर काही अंतरावर मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला होता. त्यामुळे त्या माऊलीने एकच टाहो फोडला. होता.
एकंदर पाण्यात बुडून मरण पावलेल्या व्यक्तींची संख्या अवाजवी होत चालली आहे. लॉकडाऊनच्या काळात पाण्यात बुडून मयत झालेले तब्बल 24 पेक्षा जास्त व्यक्ती आहे. त्यामुळे यावर पालक आणि समझदार व्यक्तींना थोडी सामाजिक भुमिका घेत जागरुकतेसाठी काही मोहीम हाती घेणे आवश्यक झाले आहे. विशेष म्हणजे शाळा बंद असल्यामुळे आणि बाहेर कोरोना असल्यामुळे मुले घरात बसून वैतागले आहेत. पालक घरात नाही हे लक्षात घेऊन मुले बाहेर पडतात आणि थेट नदी, नाले, ओढे, बंधारे, धरणे यात पोहण्यासाठी जातात. परिणामी हाताने मृत्युला निमंत्रण देतात. त्यामुळे पालकांनी देखील जागरुक होणे गरजेचे आहे.
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547