तो कोरोना बाधित हॉटेल चालवत होता, कोतुळ गाव पुर्णपणे बंद, मेहेंदुरीत उपचार, 11 अहवालाकडे लक्ष
शंकर संगारे
सार्वभौम (मेहेंदुरी) :
अकोल तालुक्यातील कोतुळ गावात कोरोना पॉझिटीव्ह तरुण सापडल्यानंतर एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या व्यक्तीचे एक हॉटेल असून त्याने पुणे, मुंबई, नाशिक अशा विविध ठिकाणांहून आलेल्या क्वारंटाईन व्यक्ती तसेच अन्न पदार्थाची होम डिलेवरी केल्याची समोर आले आहे. त्यामुळे, त्याच्या संपर्कात असणारे 4 हजार 500 लोकसंख्या असणारे कोतुळ गाव स्वयंप्रेरणेने होमक्वारंटाईन झाले आहेत. तर तो तरुण मेहेंदुरी येथील एक कुटूंब आणि डॉक्टरांच्या संपर्कात आल्यांने त्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. तुर्तास 11 जणांच्या अहवालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल रविवार दि. 21 रोजी कोतुळ येथील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. तो कोणाच्या संपर्कात होता हे अद्याप रुग्णाला देखील समजले नाही. त्यामुळे, कोतुळकरांनी फार जागरुक भुमिका घेत चार दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तालुक्यातून गावकर्यांचे कौतुक होत आहे. जर या व्यक्तीच्या सानिध्यात कोणी व्यक्ती आला असेल तर त्याची बाधा बाजारपेठ आणि त्यातून समाजाला होणार नाही याची दक्षता घेण्यात आली याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान हा रुग्ण मेहेंदुरी येथील एका खाजगी रुग्णालयात 6 दिवसांपूर्वी उपचार घेत होता. त्यामुळे या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्यक्तीवर मेहेंदुरी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये 2 दिवस पांढर्या पेशी कमी असल्याने उपचार सुरू होते. सदर व्यक्ती हा कोतुळ वरून ऐ-जा करत होता. तो ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता ते देखील काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. तसेच संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरासह 5 जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले असून थेट संपर्कात आलेल्या चार जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. खरतर अकोले तालुक्याला चारी बाजूंनी कोरोनाने वेढलं असताना मेहेंदुरी व पंचक्रोशीत अजून कोणत्याही प्रकारची रुग्ण आढळून आलेला नाही. परंतु कोतुळ येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती मेहेंदुरी गावाच्या संपर्कात असल्याने गावात व पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर कोरोनाबाबत आता खबरदारी घेतली नाही तर मात्र तालुक्यात कोरोना रुग्ण नव्यानं वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणी घाबरुन न जाता संपर्कात आलेल्या व्यक्तींनी प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
मी विनंती करतो की....
आजवर अकोल्यात फार चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिला आहे. 25 हजार पेक्षा जास्त लोक तालुक्यात आलेले असताना देखील येथे स्थानिक व्यक्तीला आजवर बाधा झालेली नव्हती. या व्यक्तीस कोरोना कसा झाला याचा शोध सुरू आहे. मात्र, माझी नागरिकांना विनंती आहे. जो कोणी या व्यक्तीच्या संपर्कात आला असेल त्यांनी स्वत:हून माहिती द्यावी. तुमची एक चूक तालुक्यात कोरोनाचा थैमान घालु शकते. त्यामुळे, हे युद्ध एकोप्याने जिंकायचे आहे. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा.- इंद्रजित गंभीरे (आरोग्य अधिकारी)
-------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 400 दिवसात 465 लेखांचे 60 लाख वाचक)