संगमनेरात पुन्हा तीन रुग्ण, जोर्वे नाईकवाडपुरा व घुलेवाडीचा सामावेश.!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील ०३ तर पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील एकजण बाधित. असे सहा नवे रुग्ण आज मिळून आले आहे. त्यात
संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात ५९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच घुलेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष आणि जोर्वे येथील ४५ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा. आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी झाले होते दाखल. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढता असल्याचे दिसत आहे.
तर पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एकाच कुटुंबातील दोन मुलींना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे ही लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच मूळचा झारखंड येथील असलेला आणि नगर शहरातील सारसनगर येथे राहणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तिलाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. हा व्यक्ती कर्करोगावरील उपचारासाठी मुंबई येथे प्रवास करून आला होता. या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या २८२ वर गेली आहे. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २३७ असल्याची माहिती नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर यांनी दिली आहे.