राज्यात भारी, संगमनेरची दस नंबरी! दोन दिवसात 15 जणावरे! दस नंबरीमुळे कोरोनाची शंभरी !!

Sushant pawse
सार्वभौम(संगमनेर) :- 
                             जग इकडचे तिकडे झाले तरी चालेल मात्र, संगमनेरात दस नंबरी कधी बंद होऊच शकत नाही हे आता सिद्ध झाले आहे. कारण, कोरोनाने सगळे जग थांबले होते मात्र येथील कत्तलखाने राजरोस सुरू होतेे. येथील मांस हे भाजीपाला, फळे, अन्यधान्य या अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांमधून पुणे, मुंबई नाशिक अशा ठिकाणी छुप्या मार्गाने पोहचत होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देखील अशा कारवाया झाल्या आहेत. मात्र, तरी देखील कुरण, पठारभाग आणि शहर येथे बाहेरुन जनावरे आणून त्यांची बेकायदा कत्तल केली जाते आणि हे मांस बाहेरच्या जिल्ह्यात पाठविले जाते. त्यामुळे संगमनेर एक नंबरी की दस नंबरी असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे. कारण, येथे खुलेआम जनावराच्या कत्तली होतात. मात्र, त्यावर सोलुशन निघत नाही. गेल्या दोन दिवसात पोलिसांनी तीन कारवाया केल्या असून 15 जणावरांची कत्तल होण्यापासून सुटका केली आहे. तर यात सात जणांना आरोपी करण्यात आले आहे. या तीन कारवाया संगमनेर तालुका, शहर वाहतूक शाखा व संगमनेर शहर पोलीस यांनी केल्या असून त्यात 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील जिल्हासीमा हद्दीवर कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हाउल्लंघन करणार्‍या प्रत्येक गाडीची येथे कसून चौकशी केली जाते. दरम्यान बुधवार दि.17 जून रोजी नाशिकच्या दिशेने येणार्‍या एम. एच.03,ए. एच.2419 या पिकअपने एका आयशरला धक्का देत सुसाटवेगाने गाडी पळवली. त्यास नांदूरशिंगोटे चेकपोस्ट वर पोलिसांनी हटकवले परंतु गाडीचा वेग कमी न होता अधिक भरधाव वेगाने गाडी पळवली. यावेळी वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पु कादरी व त्यांचे सहकारी पोलीस यांनी गाडीचा पाठलाग करत. सुसाट वेगाने धावणार्‍या पिकपला अगदी पाच किलोमीटरच्या अंतरावरच कर्हेगाव परिसरात पकडले. गाडीची चौकशी केली असता त्यात चार जनावरे असल्याचे लक्षात आले. त्याबाबत आरोपी यास माहिती विचारली असता त्याने संदिग्ध माहिती दिली. त्यामुळे ही जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने चालविली होती. ही खात्री होताच जनावरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रफीयोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी बबलू गुलाब शेख (वय 28 रा. कुरण, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल केले आहे.
                                 
त्या पाठोपाठ संगमनेर तालुका पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांना एक वाहन कत्तलखाण्यासाठी अवैध जणावरे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पारेगाव चौफुली जवळ नान्नज दुमाला येथे सापळा रचून संशयीत एम एच 01 एलए 3897 हे पिकअप वाहन अडविले. त्यानंतर त्यांनी गाडीत पाहिले असता काही गायी व छोटीशी वासरे असल्याचे दिसून आले. याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन राजमहमद चॉद शेख (वय 22) शकिल शब्बिर मदारी (वय 20) वसीम समा शेख व मोनु म्हमा शेख सर्व रा. कुरण ता संगमनेर यांच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात अशोक भिवाजी पारधी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 3 लाख 21 हजार 500 रुपयांचे मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तर साहेबांनी सहा जणावरांना जीवनदान दिले आहे.
हा गुन्हा दाखल होऊन त्याची फिर्याद तयार झाली कोठे नाहीतर लगेच संगमनेर शहरत पोलीस निरीक्षक अभय परमार यांना माहिती मिळाली की, जमजम कॉलनी येथे एका पिकअप वाहनातून काही जनावरे कत्तलखाण्यात नेले जाणार आहे. त्यानंतर परमार यांनी पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे व अन्य पथकास संबंधित ठिकाणी पाठविले होते. त्यावेळी बराच वेळ पोलिसांनी संशयीत ठिकाणी दबा धरला आणि अपेक्षित वाहन (एम.एच 43 एफ 9443) आले असता त्यांची चौकशी करण्यासाठी पोलीस आडवे झाले. मात्र, समोर पोलीस पाहून वाहन चालकाने गाडी सोडून पळ काढला. पोलिसांच्या हाती लागण्याच्या आत तो पसार झाला. मात्र, वाहनाची तपासणी केली असता त्यात पाच मोठे बैल असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असा विजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार वाहन चालक-मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्या ताब्यातून 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
                                     
एकंदर संगमनेर तालुक्यात मजुरी बंद, व्यापार बंद, कामधंदे बंद, बाजारपेठा बंद, अत्यावश्यक सेवा देखील काही काळ बंद मात्र कत्तलखाने राजरोस कसे चालतात! हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यांना लाईट कोण देते? यांना पाणी कोण पुरविते? यांना जागा कोण देते? यांच्या डोक्यावर हात कोण ठेवते? या सगळ्यांना आरोपी का करण्यात येत नाही? संगमनेरातून तडीपारीचे प्रस्ताव का जात नाहीत? नगरपालिका यांच्यावर कठोर पाऊले का उचलत नाही? तुम्हाला आश्यर्य वाटेल पण खरोखर संगमनेरचे मांस राज्यातील बड्या-बड्या शहरांमध्ये पोहच होत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भलेही बाहेर या शहराची ख्याती एक नंबरी गुणगाइली जाते मात्र, येथील दस नंबरी त्यापेक्षा मशहूर असल्याचे बोलले जाते. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामाजसेवक आणि सामाजिक संघटना यांनी यावर आवाज उठविणे गरजेचे आहे. याच दस नंबरीमुळे कोरोनाने शंभर गाठली असल्याचे देखील बोलले जाते. कारण, हे मांस बाहेरील जिल्ह्यात जाते, तेथून परतनारा व्यक्ती मांस देतो आणि कोरोना आणतो. त्यामुळे हा प्रकार थांबण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा असे सामान्य जनतेला वाटते आहे.