संगमनेच्या तालुक्यात तीन महिलांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न करीत मारहाण! 38 जणांवर गुन्हे! पोलीस निरीक्षकावर कारवाईची मागणी!
सार्वभौम (संगमनेर/आश्वी) :
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे गाडी लावण्याच्या वादावरुन 25 जणांनी महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत बेदम मारहान केल्याची धक्कादायक घटना घडली. यात याप्रकरणी आश्वी पोलिसानी 25 आरोपीना ताब्यात घेतले आहे. तर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार मंगळवार दि. 12 जून रोजी घडला असून यात स्थानिक पोलीस निरीक्षक यांनी वेळीच फिर्याद घेण्यासाठी टाळाटाळ करुन मुद्दाम दोन फिर्यादी दाखल करुन घेतल्या. असा आरोपी करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंग यांच्याकडे करण्यात आली आहे.या वादामुळे अद्याप गावात तणावाचे वातावरण आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गावात निवृत्ती तान्हाजी काबळे यांची गाडी लावणेवरुन मुळ वाद उद्भवला होता. त्या दिवशी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास साहिल निवृत्ती कांबळे याने तक्रारदारच्या दारासमोर गाडी लावली असता ती बाजुला घ्यावी अशी विनंती महिलेने केली होती. त्यामुळे, कांबळे यांनी अनेकाना जमवून संबंधित महिलेस शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी निवृत्ती कांबळे, शुभम कांबळे व निखिल कांबळे हे तेथे आले व त्यांनी पीडित महिलेस खाली पाडून विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगलसुत्र देखील त्यांनी तोडून घेतले. तसेच आणखी एका मुलीला आरोपी संतोष भडकवाड, संदीप भडकवाड व मंजाबापू साळवे यानी खाली पाडून विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी आरोपी निवृत्ती तान्हाजी कांबळे, शुभम निवृत्ती कांबळे, साहील निवृत्ती कांबळे, निखिल निवृत्ती कांबळे, दत्तु कचरु भडकवाड, संदिप दत्तू भडकवाड, किरण दत्तू भडकवाड, चंद्रभान कचरू भडकवाड, गनदास ससाणे, कैलास चंद्रभान भडकवाड, सुभाष गणपत भडकवाड, सतिष छबू भडकवाड, तुषार सुभाष भडकवाड, विकास भागवत भडकवाड, संजय दत्तू भडकवाड, संतोष भास्कर भडकवाड, विजय शिवाजी बलसाने, संभाजी आनंदा बलसाने, सचिन संभाजी बलसाने यांच्यासह पाच महिला (सर्व रा. आश्वी खुर्द, ता. संगमनेर) व मुंजाबापू साहेबराव साळवे (रा. पिंपरणे, ता. संगमनेर) या 25 जणांच्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
तर दुसर्या गटाच्या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत गाड्या लावण्याचे कारणावरुन हा वाद आहे. यातील आरोपीनी गैरकाद्याने मंडळी जमवुन मला व साक्षीदाराला शिवीगाळ करत लाथा बुक्यानी मारहाण केली. यावेळी आरोपी बंडू दिनकर मुन्तोडे याने माझे केस धरुन खाली पाडले व अंगावर बसून मारहाण केली. यावेळी आरोपी संपत मुन्तोडे व बबन मुन्तोडे यांनी पीडित महिलेस विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित महिलेचे मुले त्यांना सोडविण्यास आले असता त्यांनाही मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा बंडु दिनकर मन्तोडे, संपत भिमाजी मन्तोडे, बबन मोहन मन्तोडे, टी.एस मन्तोडे, करण संपत मन्तोडे, अखिल मन्तोडे, सुशिल मन्तोडे, संपत मन्तोडे याच्यासह पाच महिला (सर्व रा. आश्वी खुर्द ता. संगमनेर) अशा 13 जनाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान हा प्रकार झाल्यानंतर सुनिल भास्कर भडकवाड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंग यांच्याकडे धाव घेतली आहे. त्यांनी आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले आहेत. त्यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, वाद झाल्यानंतर साहेबांनी आमची फिर्याद न घेता आरोपींना मोकळे सोडले. उलट फिर्यादीवर दबाव आणून त्यांच्यावर परस्परविरोधी गुन्हा दाखल करुन आत टाकण्याची धमकी देण्यात आली. आणि ते झाले देखील तसेच पोलिसांनी दुसरी फिर्याद घेत 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. इतकेच काय, त्यातील 15 जणांना तत्काळ अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केले गेले. यात बहुतांशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सामावेश असून हकनाक त्यांचे आयुष्य बरबाद झाले आहे. या गुन्ह्यांची शहनिशा व्हायला हवी होती, नक्की दोषी कोण? यांची चौकशी करुन आरोपी करणे अपेक्षीत होते. त्यामुळे केवळ आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी आणि वातावरण शांंत करण्यासाठी अशी हकनाक नावे गोवली गेली आहेत. त्यामुळे, या गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी तसेच पोलीस निरीक्षक यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एसपी महोदयांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे, या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्याचा धडक निर्णय घेणारे एसपी यात काय भुमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान अनेक समाजसेवकांना वाटते आहे की, कोणतीही फिर्याद असो. ती दाखल करताना पोलिसांनी सारासार विचार केला पाहिजे. कोणीतरी येऊन जर 50 नावे सांगत असेल तर निरापराध व्यक्तींना हकनाक कायदेशीर गोष्टींना सामोरे जावे लागते. एव्हाना सुशांत सिंग यांच्यासारखे प्रतिभावंत व्यक्ती मानसिक दबावापोटी आत्महत्या करतात, तर सामान्य मानसाची काय बिशाद! त्यामुळे, पोलिसांनी फालतु गुन्ह्यांना दाखल करण्यापेक्षा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. याचे एक उदा. म्हणजे संगमनेर पोलीस ठाण्यात एक कापड व्यापारी आणि डॉक्टर यांच्यात चालु असलेल्या वादावर पोलिसांनी ठोक पुरावे जमा करुनच पुढील पाऊल उचलण्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे, खरोखर देर है मगर अंधेर नही. याची प्रचिती खात्याकडून येणे अपेक्षित आहे.