अकोल्यातील गणोर्‍यात सासुस जावयाकडून मारहाण! चौघांवर गुन्हा दाखल!


सार्वभौम (अकोले) : 
                     मुलीच्या सासरचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सासुला जावयाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 27 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गणोरे गावात घडली. यात काजल जाधव व सविता जाधव अशा दोन महिला जखमी झाल्या असून अक्षय विजय दातीर, विजय किसन दातीर, सुनिता विजय दातीर, संजिवनी मालुंजकर (सर्व रा. गणोरे, ता. अकोले) अशा चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
                   
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काजल यांचे विवाह अक्षय यांच्यासोबत झाला होता. काही दिवस यांचा एकोप्याने संसार चालला. मात्र, थोड्याच दिवसात त्यांच्यात वादंग निर्माण होऊ लागले. काजल यांना तिच्या सासारचे लोक विनाकारण त्रास देऊ लागले. हा प्रकार वारंवार होत असल्यामुळे अनावर होणारा प्रकार तिने आपल्या आई वडिलांंच्या कानावर घातला. आपल्या मुलीच्या संसारात बाधा नको. म्हणून तिच्या माहेरच्यांनी वारंवार नम्रतेची भूमिका घेतली होती. मात्र, रोजच होणार त्रास कमी करण्यासाठी व जावईबापुंना समजून सांगण्यासाठी एकदातरी त्यांची भेट घेऊन येऊ म्हणून हे त्यांच्या घरी गेले होते.
                 
   यावेळी काजल यांची आई सविता राजेंद्र जाधव व प्रकाश मधुकार आहेर यांनी थेट गणोरे गाठले. सर्वजण एकत्र बसले असता त्यांना जावई अक्षय यांच्यासह अन्य लोकांना समजून सांगण्यास सुरूवात केली. उगच भांडण्याचे काय कारण? त्यावेळी त्यांनी सांगितले की, घरसंसार घेण्यासाठी माहेरहून पैसे हवे आहेत. त्यावेळी काजल म्हणाल्या की माझ्या वडीलांकडे पैसे नाहीत. हे समजून सांगितल्याचा राग आल्याने अक्षय विजय दातीर, विजय किसन दातीर, सुनिता विजय दातीर, संजिवनी मालुंजकर यांनी तिला शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारामार्‍या सोडविण्यासाठी काजल यांच्या मातोश्री तथा अक्षय यांच्या सासुबाई यांना देखील शिविगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच जावई अक्षय यांनी सासाबाई यांचा उजवा हात पिरगाळून मनगटावर मारहाण केली. तसेच त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.
                       
 दरम्यान या प्रकरणात सविता जाधव यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. त्यांचा उजवा हात फॅक्चर झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार घेण्यात आला आहे. बुधवार दि.13 जून रोजी त्यांची प्रकृती चांगली झाल्यानंतर काजल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यता चौघांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. सदर घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल भोसले करीत आहेत.
दरम्यान जसा लॉकडाऊन सुरू झाला आहे. तेव्हापासून महिलांचा कौटुबिक छळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने हॅलो सखी म्हणून नगरला एक शाखा ओपन केली आहे. जर सासू सासरे, पती किंवा अन्य व्यक्ती घरात महिलेस त्रास देत असेल तर त्यांच्यासाठी एक मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला होता. प्रिया सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा अंमलबजावणी सुरू होती. याच लॉकडाऊनच्या काळत अनेकांचे संसार मोडल्याचे समोर येत असून कौटुंबिक वादाचे प्रमाण नगण्य झाले आहे.