निमोणच्या एकाच कुटुंबातील तीन मुलींना कोरोना तर गुंजाळवाडीत कोरोनाची एन्ट्री संख्या 82 वर


सार्वभौम (संगमनेर) :
              संगमनेर तालुक्यातील निमोण येथे तीन महिलांना तर गुंजाळवाडी येथे एक अशा चार महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला आहे. निमोण येथे एक 31 वर्षीय तरुणी, दुसरी 30 वर्षीय तरुणी तर निमोण येथेच 13 वर्षीय बालिकेला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेत गुजाळवाडी येथे 57 वर्षीय महिलेला देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा सर्वेक्षण सुरू केले असून संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. निमोण येथील एकाच कुटुंबातील तीन मुलींचा सामावेश आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निमोण येथील दोन्ही महिला या दोडी, ता. सिन्नर येथील आहेत. त्यांच्या वडिलांना कोरोना झाल्याचे समोर येताच या दोन्ही सख्या बहिनी संगमनेर तालुक्यातील निमोण येथे आल्या होत्या. जिल्हा बदल करताना त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही किंवा परवाणा घेतला नाही. त्या रविवारी आल्यानंतर त्यांनी दुसर्‍या दिसशी त्रास होऊ लागला. म्हणून त्यांनी तपासणी करण्यासाठी रुग्णालय गाठले.
दरम्यान त्यांचे स्वॅब घेतला असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. इतकेच काय? याच्या बेजबाबदारीमुळे त्यांच्या एका 13 वर्षाच्या बालिकेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
               
जर यांनी योग्यवेळी योग्य माहिती प्रशासनाला दिली असता ती आज कोणाला कोरोना झाला नसता किंवा आपल्यामुळे कोणाला बाधा झाली नसता. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने संतप्तता व्यक्त केली आहे. की, वारंवार सांगून देखील लोक माहिती का लापवत आहे. हेच कळेनासे झाले आहे.  तर एक महत्वाची गोष्ठ म्हणजे गुंजळवाडी येथे देखील एका 57 वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाली आहे. ही महिला गुंजाळवाडीची असली तर त्यांचा रहिवास हा इंदिरानगर येथे होता. त्यामुळे प्रशासनाने शहरात धाव घेतली असून इंदिरानगर म्हणजे शहरातील बडे-बडे लोक तेथे राहतात. तर ही फार गजबजलेली वस्ती आहे. त्यामुळे जर कोणाला काही त्रास होत असेल तर ती माहिती कोणी दडवू नये. कोणी बाहेरुन आले असेल तर ती माहिती प्रशासनाला कळवावी.

                         
याबाबत प्रशासनाने विनंतीपुर्वक आवाहन केले आहे की, जर कोणी बाहेरुन तालुक्यात येत असेल तर त्यांनी कोणतीही माहिती लपवू नये. आपल्याबरोबर अन्य लोकांच्या आरोग्याची काळजी आणि कोविडला जर हरवायचे असेल तर माहितीची लापवालपव करु नये. अन्याथा हा कोरोना अधिक प्रसारीत होऊ शकतो. सद्या संगमनेरात गुप्तता पाळल्यामुळे अचानक त्याचा उद्रेख होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना कळकळीची विनंती केली आहे. केवळ एक सहकार्य म्हणून फक्त माहिती लपवू नका. इतकीच विनंती. बाकी संगमनेरचे भवितव्य आपल्याच हाती आहे.!!!
- सुशांत पावसे

जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547