शेतकर्‍यांना सावधान! बाजार वाढताच टॉमेटो चोरी करणारी टोळी सक्रिय! पिकअपसह 80 जाळ्यांची चोरी, अकोल्यातील घटना


सार्वभौम (अकोले) : 
                अकोले तालुक्यातील टाकळी येथे अगस्ति मंदीराच्या परिसरात एका व्यापार्‍याने आपल्या घराजवळ टॉमेटोने भरलेल्या 80 जळ्याची पिकअप गाडी चोरुन नेली. ही घटना 10 जून रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली. यात 3 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला असून याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                   
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीकांत प्रकाश नवले (रा. अगस्ति मंदीर आगार, टाकळी, ता. अकोले. जि. अ.नगर) हे व्यापारी आहेेत. त्यांनी आजुबाजूच्या शेतकर्‍यांचे टॉमेटो घेऊन ते मोठ्या बाजारपेठेत नेण्यासाठी आपल्या एम.एच 43 एचडी 0492 या पिकअप गाडीत भरले होते. पहाटे बाजारपेठेत पोहचेल अशा पद्धतीची त्यांचा बेत होता. त्यामुळे आपले काम अटपून त्यांनी ही गाडी आपल्या घरासमोर लावली होती. त्या दिवशी ते जेवण अटपून झोपी गेले असता मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास चोरटे आले आणि त्यांनी बरोबर डाव साधला.
दरम्यान अकोले तालुक्यात जसे लॉकडाऊन सुरू झाले आहे. तेव्हापासून येथील गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेता घेत नाही.
                 विशेष म्हणजे याच रोडवर सामुहीक बलात्काराची घटना घडली होती. तर त्यानंतर काही दिवसात कारखाण्यात कामाला असणार्‍या माथेफिरुने जनावरे वळणार्‍या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. इतकेच काय! जो गायकवाड आरोपी पकडला होता. त्याची पार्श्वभूमी तपासली तरी फार मोठी गुन्हेगारी वृत्तीची होती. त्यामुळे, त्याने या परिसरात प्रचंड दहशत पसरविली होती. त्याच्याच कोणी साथीदार येथे अशा प्रकारचे उपद्रव करतोय का? याचा शोध पोलीस घेत आहे. मात्र, या परिसरात पोलीस गस्त महत्वाची वाटू लागली आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अकोले विधानसभा मतदार संघात येणार्‍या पठारभागावर गेली अनेक वर्षापासून डोंगळे चोरी करणारी टोळी सक्रीय होती. याप्रकरणी अनेक शेतकर्‍यांनी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेले आहे. मात्र, पोलिसांनी त्यांचा शोध लागलेला नाही. म्हणजे जसे पिक व बाजारभाव असेल अशा चोर्‍या करण्याचा फंडा येथे रुजू पडला आहे. मात्र, आरोपी पोलिसांच्या हातावर नेहमी तुरी देऊन निसटून जातात. पोलीस गुन्हा दाखल करुन त्याचा तपास कायम तपासावर असेच नमुद करतात. हे असेच चालु राहिले तर लॉकडाऊनमध्ये चोरट्यांमध्ये जी मंदी आली आहे. ती भरुन काढण्यात ते यशस्वी होतील खरे. मात्र, यात शेतकरी राजा हकनाक नुकसानीचा बळी ठरेल.
दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यापार्‍याने सोशल मीडियाचा वापर करीत गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मित्र, नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर पोलिसांच्या म्हणण्यानुसार आज अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपासी अधिकारी यांनी घटनास्थळ ते संबंधित रस्त्यांची सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे. काही संशयीत गोष्टींच्या आधारे त्यांचा तपास सुरू आहे. मात्र, शेतकर्‍यांनी आपापल्या मालांचे राखन करुन सुरक्षेची दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
           
   अशा घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. कारण, श्रीरामपूर येथे 33 गव्हाचे पोते चोरी गेले आहे. तर आश्वी पोलीस ठाण्यात नामदेव नांगरे रा. खळी यांचे दुकानातून किराणा माला तर गेल्या काही दिवसांपुर्वी कासारा दुमाला येथे दारुचे दुकान फोडले होतेे. तर त्याच पाठोपाठ घारगाव येथे देखील हाच प्रकार घडला होता. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस अधिक्षक यांना पोलीस ठाण्यांना रात्रगस्तीच्या सुचना किंवा ग्रामसुरक्षादल कार्यान्वीत करण्यासाठी पाऊले उचलावी लागणार आहे.

जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊन शकत नाही. असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 52 लाख वाचक असणार्‍या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 9049247452  संगमनेर : 8308139547, 8208533006

- शंकर संगारे
- महेश जेजुरकर