एकाच दिवशी संगमनेरात सात कोरोना रुग्ण, संख्या 80 वर
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यात आज एकाच दिवसात सात रुग्ण मिळून आले आहेत. यात तीन रुग्ण निमोण येथील असून ते एकाच कुटूंबातील आहे. यात 14 वर्षीय मुलगी, 18 वर्षीय मुलगा, 36 वर्षीय महिलेचा सामावेश आहे. तर शहरातील दातेमळा येथील 38 वर्षीय महिला तर मोगलपुरा येथील 48 वर्षीय महिलेचा सामावेश आहे. तर खाजगी तपासणीत लखमीपुरा येथील आणखी दोन अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, तालुक्यातील संख्या 80 पर्यंत जाऊन पोहचली आहे. या आकडेवारीमुळे संगमनेरची डोकेदुखी वाढली आहे.
सध्या संगमनेर शहरात नाईकवाडापूरा येथे 6, रेहमतनगर येथे 6, इस्लामपूरा 2, भारत नगर 3, मदिनानगर 4, कुरण रोड 1, मोना प्लॉट व कोल्हेवाडी रोड 8, मोमीनपुरा 5 नवघरगल्ली 2, लखमीपुरा 1 देवीगल्ली 1 असे शहरात 39 रुग्ण मिळून आले आहेत. त्यापैकी 35 स्थानिक असून 22 बरे झाले आहेत. 4 तालुक्याबाहेरील असून 13 जणणांवर उपचार सुरू आहेत. तर नाईकवाडापुरा, मदिनानगर व मोमीनपुरा अशा तीन ठिकाणी शहरात प्रत्येकी एक रुग्ण मयत झाला आहे.
या पलिकडे तालुक्याचा विचार केला तर धांदरफळ 8, निमोण 8, घुलेवाडी 1, केळेवाडी (बोटा) 1, निंबाळे 1, आश्वी बु 1, कौठे कमळेश्वर 1, डिग्रस 3, शेडगाव 3, खळी 1 असे निव्वळ तालुक्यात 28 रुग्ण मिळून आले आहेत. त्यापैकी 17 रुग्ण मुळ रहिवासी 11 रुग्ण तालुक्याच्या बाहेरून म्हणजे पुणे, नाशिक आणि मुंबई येथून आलेले आहेत. यापैकी 21 रुग्ण बरे झाले असून सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर धंदरफळ येथे 1, निमोण येथे 2, शेडगाव येथे 1 अशा जणांचा मृत्यू संगमनेर ग्रामीणमध्ये झाला आहे.त्यामुळे, तालुक्यातील संख्या 80 पर्यंत जाऊन पोहचली आहे. या आकडेवारीमुळे संगमनेरची डोकेदुखी वाढली आहे.
सुशांत पावसे