बेडमध्ये घुसून दारुसाठा बाहेर काढला! 4 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त! बापलेकांवर गुन्हे दाखल! शुक्ला गेले कानकाटे उगवले!


सार्वभौम (राजूर) :
                  राजूर पोलिसांनी शुक्ला गँगच्या मुसक्या आवळल्यानंतर अन्य दारु विक्रेत्यांनी आपले डोके वर काढले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंध म्हणून पोलीस सक्षम उभे असून गुरूवार दि.25 रोजी त्यांनी हॉटेल पंचशीलचे मालक राहुल गोपाळ मोहोर (रा. शेंडी) याच्याकडून जवळ-जवळ 7 लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन अब ये नाही चलेगा! अशी समज दिली होती. त्यानंतर पुन्हा आज राजूर येथे बापलेकांच्या घरात धाड टाकून अवैध धंद्यावाल्यांना पाटील यांनी अल्टीमेट दिले आहे. सोमवारी पोलिसांनी सुरेश रामभाऊ कानकाटे याच्या घरात रेड मारुन दारुचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. तर मयुर सुरेश कानकाटे व सचिन सुरेश कानकाटे यांना अटक करुन 4 लाख 20 हजार 744 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                         
 याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजूर येथे अवैध धंद्यांना बंदी घालण्यात आली आहे. जो आती करेल त्याची माती केली जाईल हे तडिपातीतून त्यांनी दाखवून दिले आहे. राजूर पोलिसांनी त्यांचा वचक निमार्र्ण केला असला तरी देखील काही भागात चोरीछुपे हा कारभार सुरू असतो हे पोलिसांच्या लक्षात आले होते. अशीच एका माहिती राजुरचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक स्थापन करुन पिचड शाळेच्या पाठीमागे सुरेश कानकाटे यांच्या घरात छापा मारण्याचे आदेश दिले. दरम्यान ही टिम तेथे गेली असता त्यांनी घराची झडती घेणे सुरू केले. त्यावेळी त्यांना बेडरूम मधील कपाटात एक खास दारू लपविण्यासाठी बनवलेल्या फर्निचरच्या कप्प्यामध्ये मोठा साठा मिळून आला. हा प्रकार महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी रमेश वाडेकर यांच्या लक्षात आल्याने तेथे तपासणी केली असता कानकाटे यांच्या गोरख धंद्याचे बिंग उघडे पडले.
                           
यात घरातील लाकडी कपाटाच्या पायथ्याच्या कप्प्यात मिळालेला प्रो व्ही गुन्ह्याचा माल 8 हजार 550 रुपये किमतीचा मेकडॉल,  नंबर वन कंपनीच्या विदेशी दारू 57 सीलबंद कॉटर प्रत्येक 180 मिलीच्या प्रत्येकी 150 रुपये दराने 2 हजार 496 रुपये किमतीचा माल. तसेच बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या 48 सीलबंद कॉटर प्रत्येक 180 मी ली च्या प्रत्येकी 52 रुपये दराने हा सर्व माल घरामध्ये पकडण्यात आला आहे. तर बाकीचा काही माल घराजवळच उभी असलेली मारुती सुझुकी कंपनीची पांढर्‍या रंगाची वॅग्नर गाडी एम एच.17. ए. झेड. 3620 यात 7 हजार 200 रुपये किमती मेक डॉल नंबर वन कंपनीचे विदेशी दारूची कॉटर प्रत्येकी 180 प्रति किमी 150 रुपये दराने खाकी रंगाच्या खोक्यात मिळाला आहे. 2 हजार 496 रुपये किमतीचा माल. तर बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या 48 सीलबंद कॉटर  प्रत्येकी 180 मि ली च्या प्रत्येकी 52 रुपये एका बॉक्स मध्ये मिळून आले. एकूण मारुती सुझुकी कंपनीची पांढर्‍या रंगाची वॅगनर कार व बाकीच्या मुद्देमाल धरून चार लाख वीस हजार 744 रुपये प्रमाणे प्रा व्हीं गुन्ह्याचा मुद्देमाल विनापरवाना माल जप्त करण्यात आला.
                               
दरम्यान याप्रकरणी पोलीस कर्मचारी मनोहर मोरे यांच्या फिर्यदिवरून राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय मुंढे करीत आहेत. ही कारवाई पोलीस हे.कॉ. कैलास नेहे, विजय मुंडे, देविदास भडकवाड,पांडुरंग पटेकर,मनोहर मोरे, म.कॉ. रोहिणी वाडेकर तर पोलीस कॉन्स्टेबल मनोहर मोरे यांनी केली. यात  सुरेश रामभाऊ कानकाटे, मुलगा सचिन सुरेश कानकाटे, मयुर सुरेश कानकाटे यांना आरोपी करण्यात आले आहे.
          भंडारदरा येथील देशी दारू लायसन धारक मालकाने राजूर येथे अनेक वेळा अवैध मार्गाने राजूर येथील मोठ्या ग्राहकांना दारू वितरित केली आहे. मात्र त्यामध्ये राजुर पोलिसांनी सखोल चौकशी दरम्यान बॅच नंबर वरून थेट त्या मालकापर्यंत पोहोचून त्याचे या अगोदर लायसन अहमदनगर पोलीस विभागा मार्फत रद्द करण्यात आले होते. तरी देखील देखील शेंडी येथील देशी दारू लायसन धारक मालकाने राजूर परिसरामध्ये दारू देणे सुरू ठेवले आहे. तर यावर पुन्हा एकदा त्या मालकावर लायसन रद्द करण्याचा अहवाल राजूर पोलिसांमार्फत पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.